मनसेचे 'या' मुद्द्यावरून स्टार नेटवर्कला ४८ तासांचे अल्टिमेटम

मराठी भाषा वगळण्याचा अधिकार नाही. इतर प्रादेशिक भाषा चालतात, मग मराठी का नाही?
मनसेचे 'या' मुद्द्यावरून स्टार नेटवर्कला ४८ तासांचे अल्टिमेटम

मराठी भाषा, मराठी पाट्या यावर मनसे पक्ष नेहमीच सक्रिय असतो. सध्या मनसेने एका प्रख्यात वहिनीला ४८ तासांचा अल्टिमेटम दिला आहे. मनसेचे अमेय खोपकर यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून ही माहिती दिली आहे.

अमेय खोपकर यांनी पोस्टमध्ये लिहिले की, 'स्टार नेटवर्कला आगामी प्रो कबड्डी सामन्यांचे प्रसारण करण्याचा अधिकार आहे. पण हे प्रसारित करताना त्यांना मराठी भाषा वगळण्याचा अधिकार नाही. इतर प्रादेशिक भाषा चालतात, मग मराठी का नाही? त्यांनी ट्विटमध्ये यापूर्वीच्या घटनांची उदाहरणे दिली. मनसेने अशाच पद्धतीने आयपीएल, सोनी स्पोर्ट्सविरोधात आवाज उठवला. त्यांनी स्टार नेटवर्कला 48 तासांचा वेळही दिला असून ते न पटल्यास मनसे आंदोलन करेल, असा इशारा दिला आहे.

प्रो-कबड्डी लीगचा हा नववा हंगाम आहे. यावेळी स्पर्धेत 12 संघ सहभागी होत आहेत. पहिल्या फेरीत एकूण 66 सामने खेळवले जाणार आहेत. ग्रुप स्टेजपर्यंत एका दिवसात दोन ते तीन सामने खेळवले जातील. बेंगळुरू व्यतिरिक्त पुणे आणि हैदराबादलाही होस्टिंग मिळाले आहे. हा हंगाम 7 ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in