Moeen Ali: मोईन अलीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा

इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू मोईन अलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. रविवारी एका मुलाखतीत त्याने निवृत्तीची घोषणा केली.
Moeen Ali: मोईन अलीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा
PTI
Published on

लंडन : इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू मोईन अलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. रविवारी एका मुलाखतीत त्याने निवृत्तीची घोषणा केली.

मोईन अली म्हणाला की, मी सध्या ३७ वर्षांचा आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध या महिन्यात होणाऱ्या आगामी मालिकेसाठी इंग्लंडच्या संघात माझी निवड झालेली नाही. इंग्लंडसाठी मी खूप क्रिकेट खेळलो आहे. आता युवा खेळाडूंना संधी देण्याची वेळ आहे. निवृत्तीसाठी मी योग्य वेळ निवडली आहे, असे अली म्हणाला.

मोईन अलीने २०१४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. अष्टपैलू खेळाडू म्हणून तो इंग्लंडसाठी ६८ कसोटी, १३८ एकदिवसीय आणि ९२ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळला. आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत त्याने ६६७८ धावा केल्या. त्यात ८ शतके आणि २८ अर्धशतकांचा समावेश आहे. गोलंदाजीतही त्याने सर्व फॉरमॅटमध्ये मिळून ३६६ विकेट्स मिळवल्या.

logo
marathi.freepressjournal.in