रिझवान पाकिस्तानचा कर्णधार; प्रशिक्षक कर्स्टन यांचा राजीनामा

मोहम्मद रिझवानची पाकिस्तानच्या एकदिवसीय व टी-२० संघाच्या कर्णधारपदी नेमणूक
रिझवान पाकिस्तानचा कर्णधार; प्रशिक्षक कर्स्टन यांचा राजीनामा
Published on

कराची : तारांकित फलंदाज मोहम्मद रिझवानची रविवारी पाकिस्तानच्या एकदिवसीय व टी-२० संघाच्या कर्णधारपदी नेमणूक करण्यात आली. मात्र त्यानंतर लगेचच सोमवारी गॅरी कर्स्टन यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्याने पाकिस्तान क्रिकेटमध्ये एका नव्या वादाला तोंड फुटले आहे.

पाकिस्तान क्रिकेट मंडळाने इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका संपल्यानंतर रविवारी टी-२० व एकदिवसीय प्रकारातील कर्णधाराची घोषणा केली. बाबर आझमने राजीनामा दिल्यामुळे रिझवानवर आता नेतृत्वपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच सलमान अघाची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली. मात्र त्यानंतर एका दिवसातच कर्स्टन यांनी राजीनामा दिल्यामुळे पाकिस्तान क्रिकेटमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे समजते. पाकिस्तान क्रिकेट मंडळाने ऑस्ट्रेलिया तसेच झिम्बाब्वे संघांविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकांसाठीही संघ जाहीर केले. तसेच आता ५६ वर्षीय कर्स्टनच्या अनुपस्थितीत कसोटी प्रशिक्षक जेसन गिलेस्पीच एकदिवसीय व टी-२० संघालाही मार्गदर्शन करतील.

logo
marathi.freepressjournal.in