
भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या अडचणी वाढू शकतात. शमीच्या अटकेसाठी शमीची पत्नी हसीन जहाँने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. हसीन जहाँने आपल्या याचिकेत कलकत्ता उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले आहे. यामध्ये सत्र न्यायालयाने शमीविरोधात जारी केलेल्या अटक वॉरंटला स्थगिती दिली. शमीच्या अटकेसाठी त्याची पत्नी हसीनने आता सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.
मोहम्मद शमीच्या अडचणीत वाढ?
शमीच्या पत्नीने कोर्टात याचिका दाखल केली आहे. पत्नी हसीन जहाँने शमीवर आरोप केले आहेत. तिच्या आरोपानुसार शमीचे विवाहबाह्य संबंध होते आणि तो हुंड्यासाठी तिचा छळ करत असे. हसीन जहाँने याचिकेत म्हटले आहे की, कायद्यानुसार कोणत्याही सेलिब्रिटीला विशेष दर्जा मिळू नये. न्यायालयाचा निर्णय चुकीचा आहे. मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहाँ यांच्यात सुरू असलेला वाद आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. जानेवारीमध्ये कोलकाता उच्च न्यायालयाने मोहम्मद शमीला पत्नीला दरमहा १.३० लाख रुपये देण्याचे आदेश दिले होते. तर पत्नीने 10 लाखांची मागणी केली होती. दरम्यान, शमीच्या अटकेलाही स्थगिती देण्यात आली होती. उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे नाराज हसीन जहाँने आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.