

नवी दिल्ली : भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. शुक्रवारी रात्री सोशल मीडियावर पोस्ट करत त्याने आपल्या निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. शमीने भारताकडून ६४ कसोटी सामने खेळताना २७.७१ च्या सरासरीने २२९ विकेट्स घेतल्या. यात सहा वेळा एका डावात पाच किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याच्या कामगिरीचा समावेश आहे.
शमीने अखेरचा कसोटी सामना २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीत खेळला होता. लंडनमधील द ओव्हल मैदानावर सर्वाधिक विकेट्सच्या यादीत १२व्या स्थानी २२९ विकेट्ससह शमी भारताच्या कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत १२व्या स्थानावर आहे. वेगवान गोलंदाजांमध्ये तो सहाव्या क्रमांकावर आहे. झालेल्या या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता.
"जड अंतःकरणाने आणि असंख्य सुंदर आठवणींसह मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेत आहे. या प्रवासात मला साथ देणाऱ्या प्रत्येक सहकारी खेळाडूचे, प्रशिक्षकाचे, कुटुंबीयांचे आणि कठीण तसेच चांगल्या काळात माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या कोट्यवधी भारतीयांचे मी आभार मानतो," असे शमीने म्हटले आहे.
विशेष म्हणजे, कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर वेस्ट इंडिजविरुद्ध शमीने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले त्याच दिवशी, म्हणजे १३ वर्षांपूर्वी ६ नोव्हेंबर २०१३ रोजी त्याने निवृत्ती जाहीर केली.
२२९ विकेट्ससह शमी भारताच्या कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत १२व्या स्थानावर आहे. वेगवान गोलंदाजांमध्ये तो सहाव्या क्रमांकावर आहे.
कारकीर्दीत अनेकदा दुखापतींचा सामना करावा लागूनही शमीने प्रत्येक वेळी दमदार पुनरागमन केले. २०२३ च्या मायदेशातील एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत त्याने संस्मरणीय कामगिरी केली होती. त्यानंतर त्याच्यावर घोट्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. गुडघ्याच्या दुखापतीमुळेही त्याला दीर्घकाळ भारतीय संघाबाहेर राहावे लागले. जानेवारी २०२५ मध्ये त्याने टी-२० क्रिकेटमधून पुनरागमन केले. त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीही त्याची भारतीय संघात निवड झाली होती. मात्र, न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यानंतर त्याला भारतीय संघाकडून कोणत्याही प्रकारात खेळण्याची संधी मिळालेली नाही. असे असले तरी तो आयपीएल आणि बंगालकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये नियमित खेळत आहे. सध्याच्या देशांतर्गत हंगामात त्याने बंगालकडून तीन रणजी सामने खेळले असून सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेसाठीही त्याची निवड झाली आहे.