बुमराह 'आऊट' झाल्याने 'या' खेळाडूला मिळणार संधी

पाठीच्या दुखापतीमुळे बुमराह या स्पर्धेत खेळणार नसल्याचे जवळपास स्पष्ट
बुमराह 'आऊट' झाल्याने 'या' खेळाडूला मिळणार संधी

भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला मुकण्याची शक्यता आहे. पाठीच्या दुखापतीमुळे बुमराह या स्पर्धेत खेळणार नसल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. मात्र आता तो दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर पडला असून त्याच्या जागी मोहम्मद सिराजला संघात स्थान देण्यात आले आहे. 'बीसीसीआय'ने यासंदर्भात घोषणा केल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. बुमराह वर्ल्ड कपमध्ये खेळू शकणार नाही. त्याच्या पाठीला झालेली दुखापत गंभीर आहे. या दुखापतीमुळे त्याला जवळपास सहा महिने मैदानाबाहेर राहावे लागू शकते, असे बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. मात्र 'बीसीसीआय'ने याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in