माझ्या खेळापेक्षा सौंदर्यावर अधिक लक्ष; नागपुरची बुद्धिबळपटू दिव्याचा आरोप

भारताची १८ वर्षीय बुद्धिबळपटू दिव्या देशमुखने मंगळवारी तिला आलेल्या अनुभवाचे कथन करतानाच गंभीर खुलासा केला.
माझ्या खेळापेक्षा सौंदर्यावर अधिक लक्ष; नागपुरची बुद्धिबळपटू दिव्याचा आरोप

नवी दिल्ली : भारताची १८ वर्षीय बुद्धिबळपटू दिव्या देशमुखने मंगळवारी तिला आलेल्या अनुभवाचे कथन करतानाच गंभीर खुलासा केला. नुकताच झालेल्या टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेत सामने पाहणेसाठी आलेल्या प्रेक्षकांचे माझ्या खेळापेक्षा मी कोणते कपडे घातले आहेत अथवा मी कशी दिसते, यावर विविध प्रतिक्रिया देत होते, असे दिव्या म्हणाली आहे. नागपूरच्या दिव्याने इन्स्टाग्रामवर यासंबंधी लांब पोस्ट लिहीली आहे. तसेच यापुढे महिला खेळाडूंच्या सौंदर्यापेक्षा त्यांच्या कामगिरीवर लक्ष द्या, असेही ती म्हणाली.

“मागच्या काही दिवसांपासून ही गोष्ट मनात होती. मात्र मी स्पर्धा संपण्याची वाट पाहात होते. मी हे कायमच पाहिलं आहे की बुद्धिबळ स्पर्धा सुरू असताना प्रेक्षक ती स्पर्धा किंवा आमचा खेळ गांभीर्याने घेत नाहीत. टाटा स्टील स्पर्धेसाठी मी नेदरलँडला गेले होते. ती स्पर्धा खूप चांगली होती. मात्र स्पर्धकांनी मला सांगितलं तसंच मीही अनुभव घेतला की प्रेक्षकांना आमचा (महिला बुद्धिबळपटू) खेळ कसा सुरू आहे यापेक्षा माझे कपडे कसे आहेत?, केस कसे बांधले आहेत, तसंच इतर गोष्टी कशा आहेत? यावर लक्ष केंद्रीत करायला आवडतं. जेव्हा आम्ही खेळत होतो तेव्हा बहुतांश प्रेक्षक मी बुद्धिबळ कशी खेळते आहे, याकडे पाहतही नव्हते,” असे दिव्या म्हणाली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in