अबब! दिग्गज फलंदाज असूनसुद्धा अवघ्या १५ धावांमध्ये संपूर्ण संघ बाद

संपूर्ण क्रिकेट इतिहासात सर्वात कमी धावा करण्याचा नकोस असलेला विक्रम आता सीडनी थंडर्सच्या नावावर
अबब! दिग्गज फलंदाज असूनसुद्धा अवघ्या १५ धावांमध्ये संपूर्ण संघ बाद
@BBL
Published on

अनेकदा क्रिकेटमध्ये आपण अनेक विक्रम मोडत असलेल्या खेळाडू किंवा संघाचे कौतुक करतो. मात्र, काही विक्रम असे असताना जे नावावर न करण्यातच सर्वांचा फायदा असतो. असाच एक नको असलेला विक्रम ऑस्ट्रेलियाच्या प्रसिद्ध असलेल्या बिग बॅश लीग २०२२मध्ये घडला आहे. सीडनी थंडर्स आणि एडलेड स्ट्रायकर्स हा सामना ऐतिहासिक ठरला. कारण, सीडनी थंडर्सने या सामन्यात फक्त १५ धावा केल्या. ही फक्त टी-२०मधीलच नव्हे तर संपूर्ण क्रिकेट इतिहासातील सर्वात कमी धावसंख्या आहे. विशेष म्हणजे, या संघात आंतरराष्ट्रीय टी-२०तील सर्वात दिग्गज फलंदाजांचा समावेश होता. तरीही एकही फलंदाजाला दुहेरी धावसंख्याही उभारता आली नाही.

एडलेड स्ट्रायकर्स विरुद्ध सीडनी थंडर्स या सामन्यात एडलेडच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ९ बाद १३९ धावा केल्या. सीडनी थंडर्स समोर १४० धावांचे लक्ष्य होते. या संघात अलेक्स हेल्स, रायली रॉस्को, डॅनियेल सॅम्ससारखे तागडे खेळाडू होते. सर्वांना वाटले होते की, सीडनी थंडर्स हे लक्ष्य सहज पार करेल. मात्र, मैअदांवर जे घडत होते त्याच्यावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता. सीडनी थंडर्सचे पाच फलंदाज शून्यावर बाद झाले. संपूर्ण संघ ५.५ षटकात फक्त १५ धावात आटोपला. त्यामुळे नकोसा असलेला विक्रम त्यांच्यावर झाला.

logo
marathi.freepressjournal.in