सिनिअर राज्य किकबॉक्सिंग स्पर्धेत मुंबईच्या खेळाडूंची सुवर्णपदकांची कमाई

गुरुकुल कृती फाउंडेशन ट्रस्ट यांनी या खेळाडूंची पूर्वतयारी करण्यासाठी आपले मोलाचे योगदान दिले होते.
सिनिअर राज्य किकबॉक्सिंग स्पर्धेत मुंबईच्या खेळाडूंची सुवर्णपदकांची कमाई
Published on

किकबॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र यांनी अहमदनगर येथे आयोजित सिनिअर राज्य किकबॉक्सिंग स्पर्धेत मुंबईचे प्राप्ती रेडकर व विघ्नेश मुरकर (क्रिएटिव्ह फॉर्म), अथर्व घाटकर (लाईट कॉन्टॅक्ट), साहिल बापेकर (लो किक) यांनी एकूण चार सुवर्णपदकांची कमाई केली.

स्पर्धेत रसिका मोरे (पॉईंट फाईट) व भूपेश वैती (लाईट कॉन्टॅक्ट) यांनी रौप्यपदके पटकाविली. राहुल साळुंखे व विघ्नेश मुरकर यांनी लाईट कॉन्टॅक्ट, महेंद्रराज नाडार पॉईंट फाईटमध्ये एकूण तीन कांस्यपदके पटकाविली.

गुरुकुल कृती फाउंडेशन ट्रस्ट यांनी या खेळाडूंची पूर्वतयारी करण्यासाठी आपले मोलाचे योगदान दिले होते. सुवर्णपदक विजेते प्राप्ती, विघ्नेश, अथर्व व साहिल हे मुंबईकर खेळाडू ऑगस्ट महिन्यात तामिळनाडू येथे होणाऱ्या सिनिअर राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

प्रशिक्षक उमेश मुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व खेळाडू प्रशिक्षण घेत आहेत. हे खेळाडू शितो रीयू स्पोर्ट्स कराटे अॅण्ड किक बॉक्सिंग असोसिएशन व स्पोर्ट किक बॉक्सिंग असोसिएशनशी संबंधित आहेत.

logo
marathi.freepressjournal.in