अजिंक्यपद कॅरम स्पर्धेच्या पुरुषांच्या सांघिक गटात मुंबईने पटकाविले विजेतेपद

मुंबईच्या विश्वविजेत्या प्रशांत मोरेने माजी विश्वविजेत्या पुण्याच्या योगेश परदेशीवर १७-१३, २५,९ असा पहिला विजय मिळवून दिला
अजिंक्यपद कॅरम स्पर्धेच्या पुरुषांच्या सांघिक गटात मुंबईने पटकाविले विजेतेपद

कै. भास्कर वामन ठाकूर यांच्या स्मरणार्थ विरार येथील जुन्या विवा कॉलेज येथे झालेल्या ५६व्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेच्या पुरुषांच्या सांघिक गटात मुंबईने विजेतेपद पटकाविले.

मुंबईच्या विश्वविजेत्या प्रशांत मोरेने माजी विश्वविजेत्या पुण्याच्या योगेश परदेशीवर १७-१३, २५,९ असा पहिला विजय मिळवून दिला; परंतु मुंबईच्या महम्मद घुफ्रानला पुण्याच्या अभिजित त्रिपनकरने ३-२५,१६-२५ असे पराभूत करून बरोबरी साधली; मात्र मुंबईच्या राहुल सोळंकी आणि योगेश धोंगडे जोडीने पुण्याच्या अनिल मुंढे आणि रहीम खान जोडीवर १५-५, २५-२० अशी मात करून मुंबईला विजतेपद मिळवून दिले.

तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत रत्नागिरीच्या अभिषेक चव्हाणने ठाण्याच्या मुजीब सय्यदला २५-५, २५-२ असे हरविले. तर रत्नागिरीच्या रियाझ अकबर अलीने ठाण्याच्या झैद अहमदवर १४-१७, २५-२३, २५-१८ असा चुरशीचा विजय मिळविला. रत्नागिरीच्या दीपक वाटेकर आणि राहुल भस्मे जोडीला ठाण्याच्या अझहर अली सय्यद आणि इब्राहिम शाह विरुद्ध २५-१, १०-१३, १३-१९ असे पराभवाला सामोरे जावे लागले.

logo
marathi.freepressjournal.in