मुंबई इंडियन्सने झहीर खानला सोपविली 'ही' जबाबदारी

एमआय’चा विस्तार झाला असून त्यात आता मुंबई इंडियन्ससह ‘एमआय अमिरात’ आणि ‘एमआय केप टाउन’ यांचा समावेश आहे
मुंबई इंडियन्सने झहीर खानला सोपविली 'ही' जबाबदारी

मुंबई इंडियन्सच्या मालकीच्या रिलायन्स इंडस्ट्रीजकडे आता आणखी दोन परदेशी लीगमधील संघ असल्याने माजी वेगवान गोलंदाज झहीर खानला ग्लोबल हेड ऑफ क्रिकेट डेव्हलपमेंट आणि श्रीलंका टीमचा माजी कर्णधार महेला जयवर्धनेला ग्लोबल हेड ऑफ परफॉर्मन्स म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

‘एमआय’साठी जागतिक क्रिकेटचा वारसा तयार करण्याच्या उद्देशाने मुंबई इंडियन्सच्या मालकांनी जयवर्धने आणि झहीर यांच्यावर नवीन जबाबदाऱ्या सोपविल्या आहेत. ‘एमआय’चा विस्तार झाला असून त्यात आता मुंबई इंडियन्ससह ‘एमआय अमिरात’ आणि ‘एमआय केप टाउन’ यांचा समावेश आहे. युएईच्या लीगसाठी ‘एमआय अमिरात’; तर केपटाउन लीगमध्ये ‘एमआय केप टाउन’ अशी नावे असणार आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in