IPL 2027 : कर्णधाराबाबत उत्सुकता शिगेला; २०२७च्या हंगामासाठी मुंबई इंडियन्सने १६ जणांना राखले कायम

आयपीएलच्या आगामी हंगामासाठी १० संघांनी आपली अंतिम खेळाडू रिटेन्शन यादी जाहीर केली आहे. यांपैकीच सर्वाधिक चर्चेत असलेल्या मुंबई इंडियन्सने १६ खेळाडूंना संघात कायम राखले असून ९ जणांना सोडचिठ्ठी दिली आहे. मात्र मुंबईचा कर्णधार कोण असेल, याविषयी अद्याप उत्सुकता कायम आहे.
IPL 2027 : कर्णधाराबाबत उत्सुकता शिगेला; २०२७च्या हंगामासाठी मुंबई इंडियन्सने १६ जणांना राखले कायम
IPL 2027 : कर्णधाराबाबत उत्सुकता शिगेला; २०२७च्या हंगामासाठी मुंबई इंडियन्सने १६ जणांना राखले कायमX
Published on: 

मुंबई : आयपीएलच्या आगामी हंगामासाठी १० संघांनी आपली अंतिम खेळाडू रिटेन्शन यादी जाहीर केली आहे. यांपैकीच सर्वाधिक चर्चेत असलेल्या मुंबई इंडियन्सने १६ खेळाडूंना संघात कायम राखले असून ९ जणांना सोडचिठ्ठी दिली आहे. मात्र मुंबईचा कर्णधार कोण असेल, याविषयी अद्याप उत्सुकता कायम आहे.

२०२७च्या आयपीएलसाठी १६ डिसेंबर रोजी गोव्यात लिलाव होणार आहे. त्यापूर्वी १७ नोव्हेंबरपर्यंत सर्व संघांना रिटेन केलेल्या (कायम राखलेल्या) खेळाडूंची यादी जाहीर करायची होती. अर्शदीप सिंगच्या जागी हार्दिक पंड्याला पंजाब किंग्जसोबत ट्रेड केल्यानंतर मुंबई कोणत्या खेळाडूंना राखणार व कर्णधारपद कोणाकडे सोपवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. अखेर किरॉन पोलार्डच्या प्रशिक्षणात खेळण्यास सज्ज असलेल्या मुंबईने १६ जणांना रिटेन केले आहे. आता लिलावात मुंबईकडे ९ खेळाडूंना खरेदी करण्याची मुभा असेल. यासाठी त्यांच्याकडे शिल्लक रक्कम ३२.६० कोटी इतकी आहे.

ट्रेंट बोल्ट, दीपक चहर यांच्या वेगवान जोडीसह फिरकीपटू अल्लाह गझनफरला मुंबईने संघमुक्त केले आहे. रोहित शर्मा, जसप्रीत बुमरा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा यांसारख्या काही प्रमुख खेळाडूंना अपेक्षेप्रमाणे संघात कायम राखले आहे. रोहितकडे पुन्हा कर्णधारपद सोपवावे, अशी चाहत्यांची इच्छा आहे. तर अनेकांनी तिलक किंवा बुमराचा पर्याय योग्य असल्याचेही सुचवले आहे. २०२८मध्ये मेगा ऑक्शन होणार असल्याने त्यापूर्वी नेमके कोणते ४ ते ५ खेळाडू संघात कायम राखायचे, याचा मुंबईला यंदाच्या हंगामात आढावा घेता येईल. मात्र तूर्तास मुंबईच्या कर्णधाराची उत्सुकता कायम आहे.

मुंबईने कायम राखलेले खेळाडू : रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमरा, तिलक वर्मा, नमन धीर, अर्शदीप सिंग, कॉर्बिन बोश, मिचेल सँटनर, शर्फेन रुदरफोर्ड, विल जॅक्स, रायन रिकल्टन, क्विंटन डीकॉक, शार्दूल ठाकूर, अश्वनी कुमार, राज बावा, रघू शर्मा.

मुंबईने संघातून काढलेले खेळाडू : हार्दिक पंड्या, ट्रेंट बोल्ट, दीपक चहर, अल्लाह गझनफर, मयांक मार्कंडे, केशव महाराज, रॉबिन मिन्झ, क्रिश भगत, दानिश मलेवार, रुचित अहिर, मोहम्मद इझार, मयांक रावत, महिपाल लोमरोर, अथर्व अंकोलेकर.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)