रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबईची दमदार खेळी

सरफराज खान ४० आणि शम्स मुलानी १२ धावांवर नाबाद आहेत
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबईची दमदार खेळी

बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्याच्या पहिल्या दिवशी पहिला दिवशी मुंबईचे वर्चस्व राहिले. मध्यप्रदेशविरुद्ध पहिल्या डावात पहिल्या दिवसाचा खेळ संपेर्पयंत मुंबईने ५ बाद २४८ धावांपर्यंत मजल मारली. सरफराज खान ४० आणि शम्स मुलानी १२ धावांवर नाबाद आहेत.

मुंबईचा कर्णधार पृथ्वी शॉने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार पृथ्वी शॉ आणि यशस्वी जैस्वाल यांनी ८७ धावांची सलामी दिली. २८ व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर अनुभव अगरवालने शॉला त्रिफळाचीत केले. कर्णधार पृथ्वी शॉने ७९ चेंडूंत ४७ धावा करताना एक षटकार आणि पाच चौकार लगावले.

अरमान जाफरचा जम बसलेला असतानाच ४१ व्या षटकात कुमार कार्तिकेयच्या गोलंदाजीवर त्याचा झेल उडाला. यश दुबेने हा झेल टिपला. अरमानने ५६ चेंडूंत तीन चौकारांसह २६ धावा केल्या. सुवेद पारकरकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असतानाच सारांश जैनने त्याला ५१ व्या षटकात आदित्य श्रीवास्तवकडे झेल देण्यास भाग पाडले. सुवेदने ३० चेंडूंत दोन चौकारांसह १८ धावा केल्या. यशस्वी जैस्वाल खेळपट्टीवर स्थिरावलेला असतानाच ६० व्या षटकातील चौथ्या चेंडूवर त्याचा संयम सुटला. अगरवालच्या गोलंदाजीवर उडालेला त्याचा झेल दुबेने टिपला. यशस्वीने सर्वाधिक ७८ धावा करताना १६३ चेंडूंना सामोरे जात एक षटकार आणि सात चौकार लगावले.

हार्दिक तामोरेला जम बसल्यानंतर आपल्या खेळीला आकार देण्यात अपयश आले. ४४ चेंडूंत तीन चौकारांसह २४ धावा केल्यानंतर तो जैनच्या गोलंदाजीवर रजत पाटीदारच्या हाती झेल देत बाद झाला. त्यावेळी ७४.५ षटकात मुंबईच्या ५ बाद २२८ धावा झाल्या होत्या.

मध्य प्रदेशकडून सर्शन जैन आणि अनुभव अग्रवाल यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. सर्शन जैनने एक गडी बाद केला.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in