जागतिक अ‍ॅथलेटिक्समध्ये मुरली श्रीशंकरला पदक जिंकण्यात अपयश

श्रीशंकरला अंतिम फेरीत ७.९६ मीटर इतकीच लांब उडी मारता आली. त्यामुळे त्याला सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
जागतिक अ‍ॅथलेटिक्समध्ये मुरली श्रीशंकरला पदक जिंकण्यात अपयश
Published on

जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये लांब उडीच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या मुरली श्रीशंकरला पदक जिंकण्यात अपयश आले. ८.३६ मीटरच्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केलेल्या श्रीशंकरला अंतिम फेरीत ७.९६ मीटर इतकीच लांब उडी मारता आली. त्यामुळे त्याला सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

श्रीशंकरकडून सहापैकी तीन प्रयत्नांत फाऊल झाले. त्याने सहाव्या प्रयत्नात ७.८३ मीटर लांब उडी मारली. त्याचबरोबर भारताची पदकाची आशा मावळली. श्रीशंकरला सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

चीनच्या जिॲनन वांगने सुवर्णपदकावर नाव कोरताना ८.३० मीटर लांब उडी मारली. ग्रीसच्या मिल्टिॲडिस टेंटोग्लोऊने ८.३२ मीटर लांब उडी मारत रौप्यपदक मिळविले.

श्रीशंकर हा जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये लांब उडीच्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला होता. तीन हजार मीटर स्टीपलचेसमध्ये तो दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला होता. याआधी २०१९ मध्येही त्याने अंतिम फेरी गाठली होती.

logo
marathi.freepressjournal.in