पाकिस्तानी ध्वज मिळाला नाही म्हणून माझ्या मुलीने भारताचा ध्वज फडकविला - शाहीद आफ्रिदी

परिवारासमवेत स्टेडियममध्ये असताना सामन्यादरम्यान माझ्या पत्नीने मला सांगितले की
पाकिस्तानी ध्वज मिळाला नाही म्हणून माझ्या मुलीने भारताचा ध्वज फडकविला - शाहीद आफ्रिदी

‘‘भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान पाकिस्तानी ध्वज मिळाला नाही म्हणून माझ्या लहान मुलीने भारताचा झेंडा फडकविला” असे एका टीव्ही कार्यक्रमात माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीने सांगितले.

मुलाखतीत त्याने माहिती दिली की, परिवारासमवेत स्टेडियममध्ये असताना सामन्यादरम्यान माझ्या पत्नीने मला सांगितले की, ‘‘या स्टेडियममध्ये केवळ १० टक्के पाकिस्तानी चाहते आहेत.’’ आफ्रिदी म्हणाला की, ‘‘पाकिस्तानी झेंडे मिळत नसल्याने माझ्या मुलीने भारताचा ध्वज फडकविल्याचे व्हिडीओही माझ्याकडे आले; मात्र ते शेअर करावे की नाही, याबाबत मला संशय होता.’’ आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत ४ सप्टेंबर रोजी भारत-पाकिस्तान यांच्यात झालेला हायव्होलटेज शाहीद आफ्रिदीने परिवारासह दुबईतील स्टेडियममध्ये बसून बघतला. दरम्यान, यावेळी आफ्रिदीच्या मुलीने भारतीय ध्वज फडकावल्याचा खुलासा त्याने स्वत: केला. तसेच तिने असे का केले याचे स्पष्टीकरणही त्याने दिले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in