माझ्या चुकीचा ख्वाजाला फटका! कोन्स्टासची अखेर कबुली

पाचव्या कसोटीतील पहिल्या डावात ख्वाजा व बुमरा यांच्यातील संवादात मी सहभागी होणे काहीसे चुकीचे ठरले.
माझ्या चुकीचा ख्वाजाला फटका! कोन्स्टासची अखेर कबुली
Published on

सिडनी : पाचव्या कसोटीतील पहिल्या डावात ख्वाजा व बुमरा यांच्यातील संवादात मी सहभागी होणे काहीसे चुकीचे ठरले. कदाचित माझ्या चुकीचाच फटका ख्वाजाला बसला व तो दिवसातील शेवटच्या चेंडूवर बाद झाला, अशी कबुली ऑस्ट्रेलियाचा १९ वर्षीय सलामीवीर सॅम कोन्स्टासने दिली.

पहिल्या दिवसातील अखेरचे षटक सुरू असताना ख्वाजा सातत्याने वेळ दवडत होता. जेणेकरून बुमराच्या षटकानंतर आणखी एक षटक गोलंदाजी होणार नाही. ही बाब बुमराने पंचांना लक्षात आणून दिली. मात्र यावेळी नॉन स्ट्राइकवरील कोन्स्टासने बुमराला सुनावले. मग बुमरानेही प्रत्युत्तर केले. परिणामी बुमराने अखेरच्या चेंडूवर ख्वाजाला बाद केले व कोन्स्टासच्या दिशेने धाव घेत आक्रमक जल्लोष केला. भारतीय संघातील अन्य खेळाडूही त्याच्यासमोर आले. “त्यावेळी बुमराचे षटक दिवसातील अखेरचे ठरावे, यासाठी आमचे प्रयत्न सुरू होते. मात्र ख्वाजा स्ट्राइकवर असताना मी बुमराला डिवचणे योग्य नव्हते,” असे कोन्स्टास म्हणाला. मेलबर्न कसोटीत कोन्स्टास आणि विराटमध्येही शाब्दिक चकमक झाली होती.

logo
marathi.freepressjournal.in