छत्तीसगड येथे आजपासून रंगणार राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा

नंदूरबारमधील राज्य अजिंक्यपद स्पर्धेत कुमार गटात सोलापूरने, तर कुमारींच्या गटात धाराशीवने विजेतेपद मिळवले.
छत्तीसगड येथे आजपासून रंगणार राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा
PM

नंदूरबार : नंदूरबार येथे झालेल्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेतील कामगिरीच्या आधारावर ४२व्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या कुमार व कुमारी संघांची घोषणा सोमवारी करण्यात आली. छत्तीसगड येथे २६ ते ३० डिसेंबरदरम्यान रंगणाऱ्या या स्पर्धेत महाराष्ट्राच्या कुमार संघाच्या कर्णधारपदी ठाण्याच्या वैभव मोरेची निवड करण्यात आली आहे, तर महाराष्ट्राच्या कुमारी संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी पुण्याची दिपाली राठोड पार पाडेल.

नंदूरबारमधील राज्य अजिंक्यपद स्पर्धेत कुमार गटात सोलापूरने, तर कुमारींच्या गटात धाराशीवने विजेतेपद मिळवले. राष्ट्रीय स्पर्धेतील संघाच्या निवडीसाठी तज्ज्ञ समिती नियुक्त करण्यात आली होती. कुमारांच्या संघात सोलापूर व पुण्याचे प्रत्येकी सर्वाधिक चार खेळाडू आहेत. मुलींमध्ये धाराशीवच्या चार, तर सांगली व ठाण्याच्या प्रत्येकी तिघींना महाराष्ट्राच्या संघात स्थान लाभले आहे.

महाराष्ट्राचे संघ

कुमार : वैभव मोरे (कर्णधार), गणेश बोरकर, फराज शेख, कृष्णा बनसोडे, प्रतिक शिंदे, चेतन बिका, तेजस जाधव, चेतन गुंडगीळ, भावेश मेश्रे, रमेश वसावे, भरत वसावे, श्रीशंभू पेठे, ओम पाटील, रोहित गावित, हर्ष कामटेकर.

प्रशिक्षक : प्रताप शेलार

कुमारी : दिपाली राठोड (कर्णधार), अश्विनी शिंदे, सुहानी धोत्रे, संध्या सुरवसे, प्रणाली काळे, सानिका चाफे, प्रतीक्षा बाराजदार, नयना काळे, दिव्या गायकवाड, सान्वी तळवडेकर, तेजस्वी पाटेकर, पूर्वा वाघ, सादिया मुल्ला, साक्षी पारसेकर, आर्या डोर्लेकर.

प्रशिक्षक : श्रीकांत गायकवाड

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in