नाशिकच्या बिंदिसाकडे महाराष्ट्र संघाचे नेतृत्व; ३१ मार्चपासून पटणा येथे किशोरींची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा

बिहारला झालेल्या किशोर गटाच्या कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राला उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला होता. भारतीय क्रीडा प्राधिकरणाने त्यांना नमवले होते. त्यामुळे आता किमान महाराष्ट्राच्या किशोरींचा संघ जेतेपद मिळवेल, अशी चाहत्यांना अपेक्षा आहे.
नाशिकच्या बिंदिसाकडे महाराष्ट्र संघाचे नेतृत्व; ३१ मार्चपासून पटणा येथे किशोरींची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा

मुंबई : महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनने ‘३३व्या किशोरी गट राष्ट्रीय कबड्डी’ स्पर्धेकरीता आपला संघ जाहीर केला आहे. नाशिकच्या बिंदिसा सोनारकडे संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपविण्यात आली, तर सांगलीची श्रावणी भोसले उपकर्णधारपद भूषवेल.

पटणा येथील पाटली पुत्र क्रीडा संकुल येथे ३१ मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत किशोरींची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेसाठी पुणे येथे नुकत्याच झालेल्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेतून ४० जणींची सराव शिबिराकरता निवड करण्यात आली होती. त्यांचे सराव शिबीर नेवासा येथे घेण्यात आला. या ४० जणींमधून स्पर्धेकरीता १२ जणांचा संघ निवडण्यात आला. यंदा जालन्याच्या ३ मुलींचा या संघात समावेश करण्यात आला आहे.

बिहारला झालेल्या किशोर गटाच्या कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राला उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला होता. भारतीय क्रीडा प्राधिकरणाने त्यांना नमवले होते. त्यामुळे आता किमान महाराष्ट्राच्या किशोरींचा संघ जेतेपद मिळवेल, अशी चाहत्यांना अपेक्षा आहे.

महाराष्ट्राचा संघ

बिंदिसा सोनार (कर्णधार), श्रावणी भोसले, मोनिका पवार, राणी भुजंग, साक्षी जाधव, भाग्यश्री गायकवाड, तनिष्का बोरकर, समीक्षा पाटील, मुग्धा शिर्के, संस्कृती सुतार, दृष्टी कुंभार, आरती शेळके. प्रशिक्षक : ज्ञानेश्वर ठोंबरे

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in