राष्ट्रीय खो-खो स्पर्धा :महाराष्ट्राच्या दोन्ही संघांची विजयी सलामी

कुमार गटात महाराष्ट्राने विदर्भाचा ३८-२६ असा १२ गुणांच्या फरकाने पराभव केला. चेतन भिका व तेजस जाधव यांनी आक्रमणात प्रत्येकी १० गुण वसूल केले.
राष्ट्रीय खो-खो स्पर्धा :महाराष्ट्राच्या दोन्ही संघांची विजयी सलामी

बेमेतरा : महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी ४२व्या कुमार-कुमारी राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत विजयी सलामी नोंदवली. दोन्ही गटांत महाराष्ट्राने विदर्भावर मात केली.

बेमेतरा (छत्तीसगड) येथील अलॉन्स पब्लिक स्कूल बिजाभटच्या मैदानावर मंगळवारपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राच्या कुमारींनी विदर्भावर २४-२० असे एक डाव व ४ गुण राखून वर्चस्व गाजवले. अश्विनी शिंदे (३.१० मिनिटे संरक्षण आणि आक्रमणात ४ गडी), संध्या सुरवसे (२.४० मि.) यांनी संरक्षणात, तर सुहानी धोत्रे (६ गडी), प्रणाली काळे (६ गडी) यांनी आक्रमणात छाप पाडली. विदर्भाकडून कृतिकाने कडवी झुंज दिली.

कुमार गटात महाराष्ट्राने विदर्भाचा ३८-२६ असा १२ गुणांच्या फरकाने पराभव केला. चेतन भिका व तेजस जाधव यांनी आक्रमणात प्रत्येकी १० गुण वसूल केले. त्यांना कर्णधार वैभव मोरे (२.२० मि., ४ गडी), गणेश बोरकर (२ मि., ४ गडी) यांनी अष्टपैलू खेळ करून सुरेख साथ दिली. विदर्भाकडून के. अमन, सुमित यांनी चांगला खेळ केला.

logo
marathi.freepressjournal.in