मोहम्मद शमीचा अर्जुन पुरस्काराने सन्मान, अवॉर्ड मिळाल्यावर झाला भावूक; म्हणाला...

भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अर्जुन पुरस्कार मिळणारा शमी हा 58 वा भारतीय क्रिकेटपटू ठरला.
मोहम्मद शमीचा अर्जुन पुरस्काराने सन्मान, अवॉर्ड मिळाल्यावर झाला भावूक; म्हणाला...

भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अर्जुन पुरस्कार मिळणारा शमी हा 58 वा भारतीय क्रिकेटपटू ठरला. तब्बल दोन वर्षांनंतर (शिखर धवन, २०२१) एखाद्या क्रिकेटपटूला अर्जुन पुरस्कार मिळाला.

या पुरस्काराने सन्मान झाल्यानंतर, “अर्जुन पुरस्कार मिळणे हे स्वप्न पूर्ण होण्यासारखे आहे” असे शमी म्हणाला. “काही माणसे यासाठी सर्वस्व पणाला लावतात. लोकांचे आयुष्य निघून जाते पण तरीही हा पुरस्कार मिळत नाही. तर, काहींना आयुष्याच्या शेवटी मी मिळतो. मी नशीबवान आहे की मला हा पुरस्कार मिळाला, असे म्हणताना शमी भावूक झाला होता. त्याने तमाम भारतीय चाहत्यांचे आभारही मानले.

भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी, तिरंदाज ओजस प्रवीण देवतळे, शीतल देवी आणि अदिती गोपीचंद स्वामी आणि कुस्तीपटू अंतीम पंघल यांचा मंगळवारी राष्ट्रपती भवनात भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अर्जुन पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात आला. गेल्या चार वर्षांत चांगल्या कामगिरीसाठी आणि नेतृत्व, खिलाडूवृत्ती असणाऱ्या खेळाडूंना हा पुरस्कार दिला जातो. 2023 मधील उत्तम कामगिरीसाठी या खेळाडूंना अर्जुन पुरस्कार मिळाले आहेत. ज्यात शमीचा समावेश आहे, ज्याने गेल्या वर्षी भारतात झालेल्या ICC क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत 24 गडी बाद करीत अनेक विक्रम मोडले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in