झारखंड येथे उद्यापासून राष्ट्रीय थ्रोबॉल स्पर्धा

चंदिल पॉलिटेक्निक कॅम्पसमध्ये तीन दिवस रंगणाऱ्या या स्पर्धेत १,५०० पुरुष-महिला खेळाडू सहभागी होतील.
झारखंड येथे उद्यापासून राष्ट्रीय थ्रोबॉल स्पर्धा
PM

मुंबई : झारखंडमधील चांदिल येथे २७ डिसेंबरपासून ३१वी सब ज्युनियर (उपकनिष्ठ) आणि ४६वी वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद थ्रोबॉल स्पर्धा सुरू होणार आहे. या स्पर्धेत एकंदर २४ राज्यांतील संघ सहभागी होणार असून महाराष्ट्राचे तिन्ही संघ छाप पाडण्यासाठी सज्ज झाले आहेत.

चंदिल पॉलिटेक्निक कॅम्पसमध्ये तीन दिवस रंगणाऱ्या या स्पर्धेत १,५०० पुरुष-महिला खेळाडू सहभागी होतील. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या खेळाडूंना झारखंडच्या कला आणि संस्कृतीची ओळख करून दिली जाईल. राज्यातील स्वादिष्ट पदार्थही खेळाडूंना देण्यात येणार आहेत. विजेत्यांना रोख पारितोषक तसेच आकर्षक चषकासह गौरवण्यात येईल. अरबाज शेख महाराष्ट्राच्या प्रशिक्षकाची, तर राहुलकुमार वाणी व्यवस्थापकाची भूमिका बजावतील.

महाराष्ट्राचे संघ

* उपकनिष्ठ मुले : मिहीर वीर, हार्दिक ब्राम्हणे, अधिक सुनील, तनिष्क घाडगे, रोहन पाटील, रितेश यादव, साहिल माने, ओम उपाध्याय, अक्षित जैस्वार, अर्णव जगधने, मानस सोनवणे, आर्यन म्हसे, युवराज बलूनी, घनश्याम भुरिया, राज चौधरी.

* उपकनिष्ठ मुली : मन्नत घरत, रिया पुल्लानीपारंबिल, गौरी जाहेरी, मुबश्शिरीन खान, अर्चान यादव, ज्ञानेश्वरी भोसले, सिद्धी बर्वे, अदिती मुनी, वैष्णवी सकपाळ, कनिष्का कांबळे, खुशी डोंगरे, अन्वी उधळीकर, समायरा चॅटर्जी.

* वरिष्ठ पुरुष : सिद्धेश पाटील, मयुरेश दिघे, अनुराग तिवारी, अंकुर कांबळे, आदित सिंग, वैभव माळी, ओम बाऊस्कर, आयुष पॉल, नीव बंदरकर, श्लोक गुप्ता, वैभव मोरे, नयन मोरे, गौरांग लिंगायत, मृणाल कालेवार, ओंकार पांचाळ.

logo
marathi.freepressjournal.in