नवी मुंबई प्रीमियर लीग : ठाणे टायगर्सच्या विजयात श्रीराज चमकला

प्रथम फलंदाजी करताना ऋग्वेद मोरेने ४८ चेंडूंत ६२ धावा केल्याने बदलापूरने २० षटकांत ४ बाद १६४ धावा केल्या
नवी मुंबई प्रीमियर लीग : ठाणे टायगर्सच्या विजयात श्रीराज चमकला

ठाणे : सामनावीर श्रीराज घरतच्या तडाखेबंद फलंदाजीच्या जोरावर गतउपविजेत्या ठाणे टायगर्स संघाने बदलापूर ब्लास्टर्स संघाचा सात विकेट्सनी दणदणीत पराभव करत नवी मुंबई प्रिमियर लीग स्पर्धेत महत्वपूर्ण विजय नोंदवला. श्रीराज घरतच्या नाबाद ८६ धावांमुळे ठाणे टायगर्स संघाने बदलापूर ब्लास्टर्सच्या १६४ धावांचे लक्ष्य सहज गाठले.

प्रथम फलंदाजी करताना ऋग्वेद मोरेने ४८ चेंडूंत ६२ धावा केल्याने बदलापूरने २० षटकांत ४ बाद १६४ धावा केल्या. अमन खानने ३६ व अंकित चव्हाणने नाबाद ३० धावा केल्या. मग श्रीराजच्या फटकेबाजीमुळे ठाणेने १८.२ षटकांतच विजयी लक्ष्य गाठले. आरुष पाटणकरने ३१, आकाश मलबारीने २७ धावांचे योगदान दिले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in