डायमंड लीग अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा : नीरज चोप्रा दुसऱ्या स्थानी

भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याने एका वर्षातील आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदवली असली तरी लुसाने येथील डायमंड लीग अॅथलेटिक्स स्पर्धेत श्रीलंकेच्या रुमेश पाथिरागेने त्याला अवघ्या ९ सेंटीमीटरच्या फरकाने मागे टाकले.
डायमंड लीग अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा : नीरज चोप्रा दुसऱ्या स्थानी
डायमंड लीग अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा : नीरज चोप्रा दुसऱ्या स्थानीX
Published on

लुसाने : भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याने एका वर्षातील आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदवली असली तरी लुसाने येथील डायमंड लीग अॅथलेटिक्स स्पर्धेत श्रीलंकेच्या रुमेश पाथिरागेने त्याला अवघ्या ९ सेंटीमीटरच्या फरकाने मागे टाकले. २८ वर्षांच्या नीरजने दुसऱ्या फेरीत ८८.०५ मीटर भाला फेकून नऊ खेळाडूंच्या या स्पर्धेत दुसरे स्थान मिळवले.

जून २०२५ मधील पॅरिस डायमंड लीगमधील ८८.१६ मीटर कामगिरीनंतरची ही त्याची सर्वोत्तम तसेच या मोसमातील सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली. तथापि, २३ वर्षांच्या पाथिरागेने तिसऱ्या फेरीत ८८.१४ मीटर भालाफेक करत नीरजला मागे टाकले आणि विजेतेपद पटकावले. ग्रेनडाचा अँडरसन पीटर ८६.६९ मीटर काम गिरीस ह तिसऱ्या स्थानी राहिला. विद्यमान जगज्जेता केशॉर्न वॉलकॉट (८३.७१ मीटर) चौथ्या, तर टोकियो ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेता याकुब व्हॅडलेच (७७.३२ मीटर) सातव्या क्रमांकावर फेकला गेला.

स्पर्धेनंतर नीरज म्हणाला, "माझ्यात आणि पाथिरागेमध्ये अवघ्या ९ सेंटीमीटरचा फरक होता, हे माझ्या लक्षात आले नाही, पण ८८ मीटरच्या कामगिरीवर मी समाधानी आहे. प्रत्येक स्पर्धेतून मी पुनरागमन करत असल्याचा अनुभव येत आहे."

या कामगिरीमुळे नीरज चोप्रा आता मोसमाच्या शेवटी होणाऱ्या 'डायमंड लीग फायनल्स'च्या क्रमवारीत सातव्या स्थानावरून अव्वल पाचमध्ये पोहोचला आहे. ४ आणि ५ सप्टेंबर रोजी ब्रुसेल्स येथे होणाऱ्या अंतिम फेरीसाठी गुणतालिकेतील अव्वल सहा खेळाडू पात्र ठरणार आहेत. पाथिरागे आणि पीटर यांनी अनुक्रमे २३ आणि २२ गुणांसह आधीच पात्रता मिळवली आहे. २७ ऑगस्ट रोजी इयुरिक येथे दुसरी डायमंड लीग होणार आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in