Neeraj Chopra : एकच मारला पण सॉलिड मारला! भारताचा 'गोल्डन बॉय' नीरज चोप्राची ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये धडक

भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करून थेट ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये धडक दिली आहे.
Neeraj Chopra Paris Olympics 2024
नीरज चोप्राची ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये धडकCanva
Published on

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक जिंकवून देणारा 'गोल्डन बॉय' भालाफेकपटू नीरज चोप्रा याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुद्धा आपली प्रतिभा सिद्ध केली आहे. मंगळवारी भालाफेकीपटूंची पात्रता फेरी पार पडली. या फेरीत भारताच्या नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करून थेट ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये धडक दिली आहे.

भालाफेकच्या पात्रता फेरीमध्ये खेळाडूंनी जर ८४ मीटर थ्रो केला तर ते थेट फायनलसाठी क्वालिफाय होतात. नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात तब्बल ८९. ३४ मीटर लांब थ्रो केला. ज्यामुळे त्याने थेट फायनलच तिकीट मिळवलं. भारताला नीरज चोप्राकडून पुन्हा एकदा सुवर्ण पदकाची अपेक्षा आहे.

Neeraj Chopra Paris Olympics 2024
Vinod Kambli : एकेकाळी मैदान गाजवणाऱ्या विनोद कांबळीची झाली अशी अवस्था; धड चालताही येत नाही! Video Viral

नीरज चोप्राचा या सीजनमधील सर्वात बेस्ट थ्रो :

आतापर्यंत भालाफेकपटू नीरज चोप्राचा या सीजनमधील सर्वात बेस्ट थ्रो हा ८८. ३६ मीटर होता. २०२४ मध्ये झालेल्या डायमंड लीगमध्ये त्याने हा थ्रो केला होता. मात्र पॅरिस ऑलिम्पिकच्या पात्रता फेरीमध्येच नीरजने या सीजनमधला सर्वोत्तम थ्रो करत जगातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेची फायनल गाठली. पात्रता फेरीमध्ये नीरजने ८९. ३४ मीटर लांब थ्रो केला. पात्रता फेरीत भारताचा दुसरा भालाफेकपटू किशोर जेना याने ८०. ७३ मीटर थ्रो केला. मात्र तो फायनल गाठण्यात अयशस्वी ठरला.

८ ऑगस्टला होणार फायनल :

ऑलिम्पिकच्या भालाफेक स्पर्धेत एकूण १२ स्पर्धक फायनलसाठी क्वालिफाय करतात. यंदा पात्रता फेरीत ८४ मीटर पेक्षा जास्त लांब थ्रो करून एकूण ७ स्पर्धकांनी फायनलमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. तर उर्वरित स्पर्धकांपैकी केवळ ५ स्पर्धकांना फायनलमध्ये स्थान मिळवता येणार आहे. ८ ऑगस्टला भालाफेक स्पर्धेचा फायनल सामना होणार असून यात नीरज चोप्रा कशी कामगिरी करतो याकडे संपूर्ण भारताचं लक्ष राहणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in