Paris Olympics : नीरज चोप्राचा ॲथलेटिक्स फायनलमध्ये प्रवेश ; २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिकसाठीही झाला पात्र

निरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात ८८.७७ मीटर लांब भाला फेकत अंतिम फेरीत मजल मारली आहे.
Paris Olympics : नीरज चोप्राचा ॲथलेटिक्स फायनलमध्ये प्रवेश ; २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिकसाठीही झाला पात्र

भारताचा गोल्डन बॉय असलेल्या २५ वर्षीय नीरज चोप्राने (Neeraj Chopra) जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत (World Athletics Championships 2023) दमदार कामगिरी करत फायनल गाठली आहे. तसंच तो २०२४ साली पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी देखील पात्र ठरला आहे. निरजने पहिल्याच प्रयत्नात ८८.७७ मीटर लांब भाला फेकत अंतिम फेरीत मजल मारली आहे. जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपचा अंतिम सामाना २७ ऑगस्ट रोजी असून यात एकूण १२ खेळाडू सहभागी होणार आहेत.

हंगेरीची राजधानी बु़डापेस्टमध्ये वर्ल्ड अॅथलेटिक्स स्पर्धा सुरु आहे. नीरज चोप्रा हा ग्रुप A मध्ये होता. आपल्या पहिल्या प्रयत्नात त्याने चक्क ८८.७७ मीटर लांब भालाफेक करत यशाचा पुढचा मार्ग मोकळा केला आहे. त्याच्या या कामगिरीबद्दल सगळीकडे त्याचे कौतुक होताना दिसत आहे. तो आत ग्रुप A मध्ये पहिल्या स्थानावर आला आहे. याचबरोबर निरज फायनलसाठी पात्र होणारा पहिला भालाफेकपटू देखील ठरला आहे.

जागतिक अॅथलेटिक्स 2023 च्या चॅम्पियनशिप मध्ये स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्रा (88.77 मीटर), किशोर जेना (80.75 मीटर) आणि डीपी मनू (81.31) या तिन्ही भालाफेकपटूंनी फायनलमध्ये प्रवेश केला. महत्वाचं म्हणजे या स्पर्धेत भारताला आतापर्यंत सुवर्ण पदकाची कमाई करता आलेली नाही. २००३ साली अंजू बॉबी जॉर्जने कांस्य पदकाची कमाई केली होती. तर मागील वर्षी नीरज चोप्राचं सुर्वण पदक थोडक्यात हुकल्याने त्याला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं होतं. यावेळी निरजला सुवर्ण कामगिरी करण्याची संधी आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in