नीरज चोप्रा डायमंड लीगसाठी सज्ज

स्वित्झर्लंड येथे २२ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या डायमंड लीग स्पर्धेत तो सहभागी होणार असून त्यादृष्टीने त्याचा सराव सुरू आहे.
नीरज चोप्रा डायमंड लीगसाठी सज्ज
Credits: Twitter
Published on

नवी दिल्ली : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदकावर समाधान मानावे लागलेला भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा काही दिवसांच्या विश्रांतीनंतर आता पुन्हा एकदा सरावासाठी मैदानात उतरला आहे. स्वित्झर्लंड येथे २२ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या डायमंड लीग स्पर्धेत तो सहभागी होणार असून त्यादृष्टीने त्याचा सराव सुरू आहे.

नीरज सध्या स्वित्झर्लंडमध्ये असून तिथेच आपला सराव करत आहे. नीरज म्हणाला की, “सुरुवातीला मी युरोपियन डायमंड लीग आणि शेवटच्या डायमंड लीगमध्ये खेळण्याचा विचार करत होतो. मात्र पॅरिस ऑलिम्पिकनंतर माझ्या दुखापतीने तितकेसे डोके वर काढलेले नाही. इशान यांच्या उपचारानंतर मी पूर्णपणे तंदुरुस्त आहे. त्यामुळेच मी २२ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या स्वित्झर्लंड डायमंड लीगमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला.”

डायमंड लीग ही या मोसमातील शेवटची लीग असून त्यानंतर नीरज भारतातच राहून वेळ व्यतित करणार आहे. तसेच तो आपल्या दुखापतीवर उपचारही करवून घेणार आहे. पॅरिस ऑलिम्पिकमधून परतल्यानंतर तीन ते चार दिवसांच्या विश्रांतीनंतर मी पुन्हा सरावाला प्रारंभ केला आहे. काही वेळ मी मुलाखती आणि अन्य कामांमध्ये व्यस्त होतो. पण नंतर मी सरावाला सुरुवात केली,” असेही त्याने सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in