जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत नीरज चोप्राने पटकाविले रौप्यपदक

जागतिक चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारा तो अंजू बॉबी जॉर्जनंतर फक्त दुसरा भारतीय ठरला
जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत नीरज चोप्राने पटकाविले रौप्यपदक

भारताचा ऑलिम्पिक चॅम्पियन भालाफेकपटू नीरज चोप्राने जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत दमदार कामगिरी करत रौप्यपदकावर नाव कोरले. नीरजने भारतासाठी पुन्हा ऐतिहासिक कामगिरी केली. जागतिक चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारा तो अंजू बॉबी जॉर्जनंतर फक्त दुसरा भारतीय ठरला. नीरज जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत पदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडूदेखील ठरला.

दरम्यान, ग्रेनेडाच्या अँडरसन पेटर्सनने सुवर्णपदक पटकाविले. त्याने ९०.५४ मीटर भाला फेकला. चेक रिपब्लिकच्या जेकब वाड्लेचने ८८.०९ मीटर भालाफेक करत कांस्यपदक मिळविले.

अंतिम फेरीत ८८.१३ मीटर लांब भालाफेक करत नीरजने भारतासाठी पदक निश्चित केले. अंतिम फेरीत नीरज चोप्राची सुरुवात निराशाजनक झाली होती. सामन्याला सुरुवात झाल्यानंतर नीरजचा पहिलाच प्रयत्न ‘फाऊल’ ठरला होता. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात त्याने ८२.३९ मीटर भाला फेकला, तर तिसऱ्या प्रयत्नात नीरजने आपल्या कामगिरीत आणखी सुधारणा करत ८६.३७ मीटरपर्यंत भालाफेक केली. नीरजने चौथ्या प्रयत्नात ८८.१३ मीटर लांब फेक करत थेट दुसऱ्या स्थानावर मुसंडी मारली. त्यानंतर नीरज चोप्राचा पाचवा प्रयत्न ‘फाऊल’ ठरला; मात्र चौथ्या प्रयत्नावेळी त्याने केलेली ८८.१३ मीटर फेक निणार्यक ठरली आणि भारताला रौप्यपदक मिळाले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in