अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत नीरज चोप्राची चमकदार कामगिरी; झुरिचमधील अंतिम फेरीसाठी स्थान निश्चित

नीरजने दुसऱ्या प्रयत्नात ८५.१८ मीटर अंतरावर भाला फेकला होता. तिसरा आणि पाचवा प्रयत्न सोडत शेवटच्या प्रयत्नात त्याने ८०.०४ मी भालाफेक केली
अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत नीरज चोप्राची चमकदार कामगिरी; झुरिचमधील अंतिम फेरीसाठी स्थान निश्चित
Published on

लुसान डायमंड लीग अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत ८९.०८ मीटर अंतरावर भाला फेकत नीरज चोप्राने पहिला क्रमांक पटकाविला. या कामगिरीनंतर झुरिचमध्ये होणाऱ्या अंतिम फेरीसाठी त्याने आपले स्थान निश्चित केले.

नीरजने दुसऱ्या प्रयत्नात ८५.१८ मीटर अंतरावर भाला फेकला होता. तिसरा आणि पाचवा प्रयत्न सोडत शेवटच्या प्रयत्नात त्याने ८०.०४ मी भालाफेक केली. स्नायूंच्या दुखापतीतून सावरत नीरज पुन्हा मैदानात परतला. जुलै महिन्याच्या अखेरीस ओरेगॉन येथे झालेल्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपदरम्यान नीरजच्या मांडीला दुखापत झाली होती. परिणामी, त्याला बर्मिंगहॅममधील सीडब्ल्यूजी २०२२ मधून माघार घ्यावी लागली होती.

logo
marathi.freepressjournal.in