नेपाळचा विंडीजला धक्का; ऐतिहासिक मालिकाविजय

नेपाळ संघाने मंगळवारी माजी विश्वविजेत्या वेस्ट इंडिजविरुद्ध प्रथमच टी-२० मालिका जिंकण्याची किमया साधली. नेपाळने दुसऱ्या टी-२० सामन्यात विंडीजला ९० धावांनी धूळ चारून मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली.
नेपाळचा विंडीजला धक्का; ऐतिहासिक मालिकाविजय
Photo : X (@CricketBadge)
Published on

शारजा : नेपाळ संघाने मंगळवारी माजी विश्वविजेत्या वेस्ट इंडिजविरुद्ध प्रथमच टी-२० मालिका जिंकण्याची किमया साधली. नेपाळने दुसऱ्या टी-२० सामन्यात विंडीजला ९० धावांनी धूळ चारून मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली.

नेपाळने पहिल्या सामन्यात विंडीजवर १९ धावांनी मात केली होती. मग दुसऱ्या लढतीत प्रथम फलंदाजी करताना नेपाळने २० षटकांत ६ बाद १७३ धावा केल्या. आसिफ शेखने ४७ चेंडूंत नाबाद ६८, तर संदीप जोराने ३९ चेंडूंत ६३ धावा फटकावल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना अकील होसेनच्या नेतृत्वात खेळणारा विंडीजचा संघ १७.१ षटकांत ८३ धावांत गारद झाला. जेसन होल्डरने सर्वाधिक २१ धावा केल्या. वेगवान गोलंदाज मोहम्मद आदिलने ४ बळी मिळवले. विंडीजच्या संघाची टी-२० प्रकारातही कामगिरी कितवर खालावली आहे, हे स्पष्ट झाले.

logo
marathi.freepressjournal.in