न्यूझीलंड-आफ्रिका कसोटी मालिका- रचिनचे द्विशतक; आफ्रिकेची दैना

युवा डावखुरा फलंदाज रचिन रवींद्रने (३६६ चेंडूंत २४० धावा) कारकीर्दीतील पहिले द्विशतक झळकावले. त्यामुळे न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत सामन्यात ५११ धावांचा डोंगर उभारला.
न्यूझीलंड-आफ्रिका कसोटी मालिका- रचिनचे द्विशतक; आफ्रिकेची दैना

वेलिंग्टन : युवा डावखुरा फलंदाज रचिन रवींद्रने (३६६ चेंडूंत २४० धावा) कारकीर्दीतील पहिले द्विशतक झळकावले. त्यामुळे न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत सामन्यात ५११ धावांचा डोंगर उभारला.

त्यानंतर पहिल्या दिवसअखेरीस आफ्रिकेची २८ षटकांत ४ बाद ८० अशी अवस्था असून ते अद्याप ४३१ धावांनी पिछाडीवर आहेत. डेव्हिड बेडिंगहॅम २९, तर किगन पीटरसन २ धावांवर खेळत आहे. कायले जेमिसनने दोन बळी मिळवले.

तत्पूर्वी, रविवारच्या २ बाद २५८ धावांवरून पुढे खेळताना केन विल्यम्सन (११८) शतकानंतर माघारी परतला. मात्र रचिनने २६ चौकार व ३ षटकारांसह द्विशतक साकारले. त्याला डॅरेल मिचेल (३४), ग्लेन फिलिप्स (३९) यांनी उत्तम साथ दिली. कर्णधार तसेच डावखुरा फिरकीपटू नील ब्रँडने सहा गडी बाद केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in