साऊदीचा कसोटीला विजयासह अलविदा; न्यूझीलंड-इंग्लंड कसोटी मालिका

३६ वर्षीय अनुभवी वेगवान गोलंदाज टिम साऊदीला न्यूझीलंडच्या संघाने दमदार कसोटी विजयासह निरोप दिला.
साऊदीचा कसोटीला विजयासह अलविदा; न्यूझीलंड-इंग्लंड कसोटी मालिका
Published on

हॅमिल्टन : ३६ वर्षीय अनुभवी वेगवान गोलंदाज टिम साऊदीला न्यूझीलंडच्या संघाने दमदार कसोटी विजयासह निरोप दिला. मिचेल सँटनरने मिळवलेल्या ४ बळींच्या जोरावर न्यूझीलंडने तिसऱ्या कसोटीत इंग्लंडचा ४२३ धावांनी फडशा पाडला. मात्र या पराभवानंतरही इंग्लंडने मालिकेत २-१ असे यश संपादन केले.

न्यूझीलंडने दिलेल्या ६५८ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा दुसरा डाव ४७.२ षटकांत २३४ धावांत संपुष्टात आला. जेकब बिथेल (७६) व जो रूट (५४) यांनी अर्धशतकी झुंज दिली. मात्र सँटनरने ४, तर साऊदी व हेन्री यांनी प्रत्येकी २ बळी मिळवले. या मालिकेतील पहिल्या दोन कसोटीत इंग्लंडने बाजी मारून विजयी आघाडी घेतली होती. तिसऱ्या कसोटीत बेन स्टोक्सला दुखापत झाल्याने तो फलंदाजीस येऊ शकला नाही. सामन्यात ७ बळींसह १२५ धावा करणारा सँटनर सामनावीर ठरला. तर ३ कसोटींमध्ये सर्वाधिक ३५० धावा करणारा हॅरी ब्रूक मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

सामन्यानंतर साऊदीने ड्रेसिंग रूममध्ये परतताना न्यूझीलड संघाचे नेतृत्व केले. साऊदीने १०७ कसोटींमध्ये ३९१ बळी मिळवले. यामध्ये १५ वेळा डावात ५ बळी मिळवण्याचाही समावेश आहे. त्याच्या निवृत्तीसह न्यूझीलंड क्रिकेटमधील एका पर्वाचा अस्त झाला.

logo
marathi.freepressjournal.in