ICC T20 World Cup 2026 : न्यूझीलंड सुपर-आठ फेरीत; नेपाळचा शेवट गोड

टी-२० विश्वचषकात मंगळवारी न्यूझीलंडने कॅनडाला धूळ चारून ड-गटातून आगेकूच केली. तर क-गटात नेपाळने आपला अखेरचा साखळी सामना जिंकताना स्कॉटलंडला नमवून स्पर्धेचा शेवट गोड केला.
ICC T20 World Cup 2026 : न्यूझीलंड सुपर-आठ फेरीत; नेपाळचा शेवट गोड
Published on

चेन्नई : टी-२० विश्वचषकात मंगळवारी न्यूझीलंडने कॅनडाला धूळ चारून ड-गटातून आगेकूच केली. तर क-गटात नेपाळने आपला अखेरचा साखळी सामना जिंकताना स्कॉटलंडला नमवून स्पर्धेचा शेवट गोड केला.

भारत आणि श्रीलंका येथे संयुक्तपणे टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. ७ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत रंगणाऱ्या या स्पर्धेत यंदाही गेल्या वेळेप्रमाणे २० संघ सहभागी झाले आहेत. प्रत्येकी पाच संघांचा एक असे चार गट बनवण्यात आले आहेत. भारत २०१६नंतर प्रथमच टी-२० विश्वचषकाचे यजमानपद भूषवत आहे. रोहितच्या नेतृत्वात २०२४मध्ये भारताने टी-२० विश्वचषक उंचावला. आता भारतापुढे जेतेपद टिकवण्याचे आव्हान असेल.

या स्पर्धेत अ-गटात भारत, पाकिस्तान, अमेरिका, नेदरलँड्स, नामिबिया यांचा समावेश आहे. ब-गटात ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, आयर्लंड, झिम्बाब्वे, ओमान हे संघ आहेत. क-गटात इंग्लंड, वेस्ट इंडिज, नेपाळ, इटली, स्कॉटलंड यांना स्थान देण्यात आले आहे, तर ड-गटात न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, कॅनडा, संयुक्त अरब अमिराती (यूएई) यांचा समावेश आहे. प्रत्येक गटातून आघाडीचे दोन संघ सुपर-आठ फेरीत दाखल होतील. मग सुपर-आठ फेरीत दोन गट तयार केले जातील. या फेरीच्या अखेरीस आघाडीवर असलेले दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र होतील. ७ मार्चला अहमदाबाद येथे अंतिम सामना खेळवण्यात येईल.

न्यूझीलंड सुपर-आठ फेरीत; नेपाळचा शेवट गोड
न्यूझीलंड सुपर-आठ फेरीत; नेपाळचा शेवट गोड

न्यूझीलंडने कॅनडावर ८ गडी व २९ चेंडू राखून वर्चस्व गाजवले. कॅनडाने युवराज सामराच्या (११०) शतकाच्या बळावर २० षटकांत ४ बाद १७३ धावा केल्या. मात्र ग्लेन फिलिप्स (नाबाद ७६) व रचिन रवींद्र (नाबाद ५९) यांनी अर्धशतके झळकावून न्यूझीलंडचा विजय साकारला.

नेपाळने स्कॉटलंडने दिलेले १७० धावांचे आव्हान १९.३ षटकांत गाठले. वानखेडेवर या लढतीला उत्तम प्रतिसाद लाभला.

logo
marathi.freepressjournal.in