न्यूझीलंडचा संघ जाहीर; मार्टिन गप्टिल खेळणार सातवा विश्वचषक

केन विल्यम्सनच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडला गतवर्षी अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला
न्यूझीलंडचा संघ जाहीर; मार्टिन गप्टिल खेळणार सातवा विश्वचषक

आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी न्यूझीलंडने मंगळवारी १५ खेळाडूंचा संघ जाहीर केला. अनुभवी सलामीवीर मार्टिन गप्टिलचा हा विक्रमी सातवा ट्वेन्टी-२० विश्वचषक ठरणार असून या संघातील वेगवान गोलंदाज कायले जेमिसनला डच्चू देण्यात आला आहे.

केन विल्यम्सनच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडला गतवर्षी अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. त्यावेळी जेमिसन संघाचा भाग होता. त्याशिवाय टॉड अॅस्टल आणि टिम सेईफर्टलाही वगळण्यात आले आहे. फिन अॅलन, मायकल ब्रेसवेल हे प्रथमच विश्वचषकात खेळतील. न्यूझीलंड २२ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीने विश्वचषकाच्या अभियानाला प्रारंभ करणार आहे. ट्रेंट बोल्ट, टिम साऊदी, लॉकी फर्ग्युसन, अॅडम मिल्ने अशी वेगवान चौकडी न्यूझीलंडच्या ताफ्यात आहे. त्याशिवाय विल्यम्सनसह डेवॉन कॉन्वे, ग्लेन फिलिप्स, डॅरेल मिचेल यांच्याकडून त्यांना मधल्या फळीत चमकदार कामगिरीची अपेक्षा आहे.

न्यूझीलंडचा संघ : केन विल्यम्सन (कर्णधार), मार्टिन गप्टिल, डेवॉन कॉन्वे, फिन अॅलन, टिम साऊदी, इश सोधी, मिचेल सँटनर, जीमी नीशाम, डॅरेल मिचेल, ग्लेन फिलिप्स, अॅडम मिल्ने, ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, मायकल ब्रेसवेल, लॉकी फर्ग्युसन.

logo
marathi.freepressjournal.in