वन-डे मालिकेत न्यूझीलंडचा आयर्लंडला व्हाईटवॉश

अखेरच्या वन-डेत न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
वन-डे मालिकेत न्यूझीलंडचा आयर्लंडला व्हाईटवॉश
Published on

न्यूझीलंडने शुक्रवारी डबलिन येथे झालेल्या तिसऱ्या वन-डे सामन्यात आयर्लंडचा अवघ्या एका धावेने पराभव केला. या विजयासह न्यूझीलंडने वन-डे मालिका ३-०ने जिंकत आयर्लंडला व्हाईटवॉश दिला. अखेरच्या षट्कात आयर्लंडला विजयासाठी १० धावांची गरज होती; पण त्यांना आठच धावा करता आल्या.

अखेरच्या वन-डेत न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मार्टिन गप्टिलच्या शतकी खेळी आणि अन्य इतरांची धमाकेदार फलंदाजी यामुळे ५० षट्कात ६ बाद ३६० धावा केल्या. गप्टिलने १२६ चेंडूत १५ चौकार आणि २ षट्कार लगावत ११५ धावा केल्या.

विजयासाठी ३६१ धावांचे मोठे आव्हान असतानाही आयर्लंड संघाने जबरदस्त लढत दिली. आयर्लंडची सुरुवात खराब झाली. सलामीवीर आणि कर्णधार शून्यावर बाद झाला; मात्र त्यानंतर पॉल स्टर्लिंग आणि हॅरी टेक्टर न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर जबरदस्त आक्रमण केले.

या दोघांनी वादळी शतकी खेळी केली. पॉलने १०३ चेंडूत १२० धावा केल्या; हॅरीने १०६ चेंडूत १०८ धावा केल्या.

अखेरच्या सहा चेंडूत आयर्लंडला विजयासाठी १० धावांची गरज होती. पहिल्या चेंडूवर ग्राहम ह्यूमला धावा घेता आली नाही. दुसऱ्या चेंडूवर एक धाव घेतल्यानंतर क्रेग यंगने तिसऱ्या चेंडूवर चौकार मारला. आता आयरर्लंडला ३ चेंडूत ५ धावांची गरज होती; मात्र चौथ्या चेंडूवर धाव घेण्याच्या प्रयत्नात यंग धावबाद झाला. पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर त्यांना प्रत्येकी एक धावच घेता आली.

logo
marathi.freepressjournal.in