न्यूझीलंडचा पाकिस्तानला व्हाइटवॉश

मिचेल ब्रेसवेलने (५९ धावा आणि १ बळी) केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर न्यूझीलंडने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानला ४३ धावांनी धूळ चारली.
न्यूझीलंडचा पाकिस्तानला व्हाइटवॉश
एक्स @BLACKCAPS
Published on

ख्राईस्टचर्च : मिचेल ब्रेसवेलने (५९ धावा आणि १ बळी) केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर न्यूझीलंडने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानला ४३ धावांनी धूळ चारली. या विजयासह न्यूझीलंडने मालिकेत ३-० असे यश संपादन करताना पाकिस्तानवर व्हाइटवॉश लादला.

प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडन ४२ षटकांत ८ बाद २६४ धावांपर्यंत मजल मारली. पावसामुळे ८ षटके कमी करण्यात आली. रास मारियू (६१ चेंडूंत ५८) आणि कर्णधार ब्रेसवेल (४० चेंडूंत ५९) यांनी दमदार अर्धशतके झळकावली. तसेच डॅरेल मिचेल (४३), हेन्री निकोल्स (३१) यांनीही उत्तम योगदान दिले. पाकिस्तानसाठी अकिफ जावेदने ४ बळी मिळवले.

लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ ४० षटकांत २२१ धावांत गारद झाला. बाबर आझमने ५० धावांची एकाकी झुंज दिली. कर्णधार मोहम्मद रिझवाननेही ३२ चेंडूंत ३७ धावा केल्या. मात्र त्यानंतर बेन सीर्सच्या गोलंदाजीपुढे पाकिस्तानचा संघ ढेपाळला. सीर्सने ५, तर जेकब डफीने २ बळी मिळवले. ब्रेसवेलला सामनावीर, तर ३ सामन्यांत १० बळी मिळवल्याने सीर्स मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

logo
marathi.freepressjournal.in