न्यूझीलंडचा आफ्रिकेवर पहिला मालिका विजय

न्यूझीलंडचा आफ्रिकेवर पहिला मालिका विजय

आफ्रिकेचा दुसरा डाव २३५ धावांत संपुष्टात आल्यावर किवींपुढे विजयासाठी २६७ धावांचे लक्ष्य होते.

हॅमिल्टन : कर्णधार केन विल्यम्सनने (२६० चेंडूंत नाबाद १३३ धावा) साकारलेल्या आणखी एका शतकाच्या बळावर न्यूझीलंडने दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ७ गडी राखून धूळ चारली. याबरोबरच न्यूझीलंडने मालिकेत २-० असे यश संपादन केले. तसेच न्यूझीलंडने आफ्रिकेविरुद्ध प्रथमच कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला.

आफ्रिकेचा दुसरा डाव २३५ धावांत संपुष्टात आल्यावर किवींपुढे विजयासाठी २६७ धावांचे लक्ष्य होते. विल्यम्सनने कसोटी कारकीर्दीतील ३२वे आणि विल यंगने नाबाद ६० धावा केल्यामुळे न्यूझीलंडने ९४ षटकांत विजयी लक्ष्य गाठले. लढतीत एकूण ९ बळी मिळवणारा विल्यम ओरूके सामनावीर, तर दोन सामन्यांत सर्वाधिक ४०३ धावा करणारा विल्यम्सन मालिकावीर ठरला. आता न्यूझीलंडचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० व कसोटी मालिका खेळणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in