नवनिर्वाचीत 'भारतीय कुस्ती महासंघ' निलंबित; क्रीडा मंत्रालयाची मोठी कारवाई

कुस्ती महासंघाने नियम आणि अटींचे पालन केले नसल्याचे म्हणत क्रीडा मंत्रालयाने ही कारवाई केली आहे. यामुळे नुकतेच कुस्ती महासंघाचे अध्यक्ष म्हणून निवडूण आलेले संजय सिंह आता या पदावर राहु शकणार नाहीत. ही कारवाई करताना संजय सिंह यांनी घेतलेल्या सर्व निर्णयांना देखील स्थगिती देण्यात आली आहे.
नवनिर्वाचीत 'भारतीय कुस्ती महासंघ' निलंबित; क्रीडा मंत्रालयाची मोठी कारवाई

भारतीय क्रीडा मंत्रालयाने आज(२४ डिसेंबर) भारतीय कुस्ती महासंघाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. क्रीडा मंत्रालयाने संजय सिंह यांच्या अध्यतेखालील नवनिर्वाचीत भारतीय कुस्ती महासंघ निलंबित केला आहे. कुस्ती महासंघाने नियम आणि अटींचे पालन केले नसल्याचे म्हणत ही कारवाई केली आहे. यामुळे आता नुकतेच कुस्ती महासंघाचे अध्यक्ष म्हणून निवडून आलेले संजय सिंह आता या पदावर राहु शकणार नाहीत. ही कारवाई करताना संजय सिंह यांनी घेतलेल्या सर्व निर्णयांना देखील स्थगिती देण्यात आली आहे.

 भारतातील आघाडीच्या कुस्तपटूंनी भाजप खासदार ब्रिजभषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. यामुळे त्यांना कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर ११ महिन्यांनी झालेल्या कुस्ती महासंघाच्या निवडणूकीत ब्रिजभूषण यांचे सहकारी आणि व्यावसायिक भागीदार असेलेले संजय सिंह हे निवडून आले होते.

ब्रिजभूषण यांचे निकटवर्तीयच कुस्ती महासंघाचे अध्यक्ष म्हणून निवडूण आल्याने ऑलिम्पिक पदक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिकने पत्रकार परिषद घेत कुस्ती सोडल्याचा निर्णय घेतला होता. तसेच ऑलिम्पिक पदकविजेता कुस्तीपटू बजरंग पुनियाने देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहित पद्मश्री पुरस्कार परत केला होता. कुस्तीपटूंच्या वाढत्या दबावानंतर क्रीडा मंत्रालयाने नव्याने सत्तेवर आलेल्या कुस्तीमहासंघाला निलंबित केले आहे. ही कारवाई करताना संजय सिंह यांनी घेतलेल्या सर्व निर्णयांना आणि पुढील आदेश मिळेपर्यंत कुठलीही कारवाई न करण्याला क्रीडा मंत्रायलाने स्थगिती दिली आहे. हा निर्णय ब्रिजभूषण सिंह आणि संजय सिंह यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in