काल (शनिवारी) महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत (World Boxing Championship) भारतीय बॉक्सर स्वीटी बुरा आणि नीतू घंघास यांनी सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर आज महिला बॉक्सर निखत जरीनने (Nikhat Zareen) सुवर्णपदक जिंकण्याची कामगिरी केली आहे. तिने व्हिएतनामच्या न्यूगेन थी तामचा ५ - ० असा दारुण पराभव करत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले.
या स्पर्धेतील हे तिसरे सुवर्ण पदक ठरले आहे. विशेष म्हणाले निखतने गेल्या वर्षीही मी महिन्यात याच स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावले होते.
स्वीटी बुरा आणि नीतू घंघास यांनी सुवर्ण पदक जिंकल्यानंतर आज सर्वांचे लक्ष निखत जरीनच्या सामन्याकडे होते. अंतिम सामन्यात निखतने सुरुवातीपासूनच चमकदार कामगिरी करत न्यूगेन थी तामचा पराभव केला. यापूर्वी शनिवारी ४८ किलो वजनी गटात नीतू घंघासने सुवर्ण पदक जिंकले. त्यानंतर ८१ किलो वजनी गटामध्ये स्वीटी बुराने देशासाठी सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले.