World Boxing Championship : भारताच्या बॉक्सर नीतू घंघासचा सुवर्ण पंच

जागतिक महिला बॉक्सिंग चँपियनशिप स्पर्धेत (World Boxing Championship) भारतीय बॉक्सर नीतू घंघासने ४८ किलो वजनी गटात केली सुवर्ण कामगिरी
World Boxing Championship : भारताच्या बॉक्सर नीतू घंघासचा सुवर्ण पंच
@ANI
Published on

दिल्ली येथे सुरु असलेल्या जागतिक महिला बॉक्सिंग चँपियनशिप (World Boxing Championship 2023) स्पर्धेमध्ये भारतीय बॉक्सर नीतू घंघासने (Nitu Ghangas) सुवर्ण पदक मिळवले आहे.

तिने मंगोलियाच्या लुटसेखर अलतेंगसेंगचा पराभव करत ही सुवर्ण कामगिरी केली. बॉक्सर नीतू घंघासने लुटसेखरचा ५-० अशा फरकाने पराभव केला. शनिवारी नीतूने कझाकिस्तानच्या बॉक्सरचा पराभव करत अंतिम सामन्यात धडक मारली होती.

दरम्यान, रविवारी आणखी २ पदके मिळण्याची अपेक्षा आहे. कारण, ८१ किलो वजनी गटामध्ये भारतीय बॉक्सर स्वीटी बूराने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. तर, निखत जरीन आणि लवलीना बोरहेगनच्या सामन्याकडेही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. या दोघींकडूनही भारतीयांना सुवर्णपदाची अपेक्षा आहेत. दरम्यान, नीतू घंघासने केलेल्या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

logo
marathi.freepressjournal.in