IND vs PAK : काहीही झालं तरी भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नाही - जय शहा

जवळपास 10 वर्षे दोन्ही संघ एकमेकांच्या भूमीवर क्रिकेट खेळलेले नाहीत. फक्त आयसीसी टूर्नामेंट आणि आशिया कपमध्येच दोघे एकमेकांसमोर येतात
IND vs  PAK : काहीही झालं तरी भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नाही - जय शहा

भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) दोन्ही देशांमधील तणावपूर्ण संबंधांमुळे एकमेकांचा दौरा करत नाहीत. आगामी आशिया चषक 2023 साठी भारत पाकिस्तानला जाणार नसल्याचे बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी स्पष्ट केले आहे. ही स्पर्धा अन्य ठिकाणी व्हावी, अशी मागणीही शहा यांनी केली. बीसीसीआयची सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली, शाह यांनी ही घोषणा केली. यावेळी इतर विषयांवरही चर्चा झाली आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी आगामी आशिया चषक 2023 बद्दल बोलताना स्पष्ट विधान केले की भारत ही स्पर्धा खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार नाही. ही स्पर्धा पाकिस्तान सोडून अन्य ठिकाणी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली. आशिया कपमधील संघाचा विचार करता ही स्पर्धा यूएईमध्ये होऊ शकते. 

भारत आणि पाकिस्तानमधील संबंध चांगले नसल्यामुळे ते एकमेकांचा दौरा करत नाहीत. भारताचा विचार केला तर, भारतीय संघाने शेवटचा 2005-06 मध्ये राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा दौरा केला होता. पाकिस्तानने 2012-13 मध्ये भारताचा दौरा केला होता, जवळपास 10 वर्षे दोन्ही संघ एकमेकांच्या भूमीवर क्रिकेट खेळलेले नाहीत. फक्त आयसीसी टूर्नामेंट आणि आशिया कपमध्येच दोघे एकमेकांसमोर येतात. आता 23 ऑक्टोबरला टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in