नॉर्किएचे पुनरागमन, भारताविरुद्धच्या एकदिवसीय व टी-२० मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचे संघ जाहीर

सध्या भारत-आफ्रिका संघांत कसोटी मालिका सुरू आहे. त्यानंतर उभय संघांत ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका व ५ सामन्यांची टी-२० मालिका रंगणार आहे.
आनरिख नॉर्किए
आनरिख नॉर्किए
Published on

जोहान्सबर्ग : भारताविरुद्ध रंगणाऱ्या एकदिवसीय व टी-२० मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचे संघ जाहीर करण्यात आले आहेत. वेगवान गोलंदाज आनरिख नॉर्किएचे आफ्रिकेच्या संघात जवळपास दीड वर्षांनी पुनरागमन झाले आहे.

सध्या भारत-आफ्रिका संघांत कसोटी मालिका सुरू आहे. त्यानंतर उभय संघांत ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका व ५ सामन्यांची टी-२० मालिका रंगणार आहे. ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या काळात एकदिवसीय मालिका होईल. तर ९ ते १९ डिसेंबर या काळात पाच टी-२० सामने होतील. बव्हुमा एकदिवसीय संघाचे, तर एडीन मार्करम आफ्रिकेच्या टी-२० संघाचे नेतृत्व करणार आहे.

दरम्यान, ३२ वर्षीय नॉर्किए स्नायूंच्या दुखापतीसह अन्य दुखण्यामुळेही गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर होता. तो २०२४मध्ये अखेरचा टी-२० सामना खेळला आहे. मात्र डॉल्फिन संघाकडून नुकताच त्याने स्थानिक स्पर्धेत खेळून तंदुरुस्ती सिद्ध केली. त्यामुळे नॉर्किएला संघात सहभागी करण्यात आले आहे. तसेच डीकॉकचा एकदिवसीय व टी-२० अशा दोन्ही संघांत समावेश करण्यात आला आहे. या मालिकांसाठी भारताचा संघ लवकरच जाहीर होईल.

दक्षिण आफ्रिकेचे संघ

  • टी-२० मालिका : एडीन मार्करम (कर्णधार), ओटनिल बार्टमन, कॉर्बिन बोश, डेवाल्ड ब्रेविस, क्विंटन डीकॉक, टॉनी डी झॉर्झी, डोनोवन फरेरा, रीझा हेंड्रिक्स, मार्को यान्सेन, जॉर्ज लिंडे, क्वेना मफाका, डेव्हिड मिलर, लुंगी एन्गिडी, आनरिख नॉर्किए, केशव महाराज, ट्रिस्टन स्टब्स.

  • एकदिवसीय मालिका : टेम्बा बव्हुमा (कर्णधार), ओटनिल बार्टमन, कॉर्बिन बोश, मॅथ्यू ब्रीट्झके, डेवाल्ड ब्रेविस, नांद्रे बर्गर, क्विंटन डीकॉक, टॉनी डी झॉर्झी, रुबिन हर्मन, केशव महाराज, मार्को यान्सेन, एडीन मार्करम, लुंगी एन्गिडी, रायन रिकल्टन, प्रेनलेन सुब्रायन.

logo
marathi.freepressjournal.in