जोकोव्हिचला पाचव्यांदा लॉरेओ पुरस्कार

क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या लॉरेओ पुरस्कारासाठी यंदा सर्बियाचा तारांकित टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिच आणि स्पेनची महिला फुटबॉलपटू ऐताना बोनमती यांची निवड...
जोकोव्हिचला पाचव्यांदा लॉरेओ पुरस्कार

नवी दिल्ली : क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या लॉरेओ पुरस्कारासाठी यंदा सर्बियाचा तारांकित टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिच आणि स्पेनची महिला फुटबॉलपटू ऐताना बोनमती यांची निवड करण्यात आली. जोकोव्हिचने गेल्या वर्षी एटीपी फायनल्ससह तीन ग्रँडस्लॅम विजेतीपदे मिळवली होती.

कारकीर्दीत विक्रमी २४ ग्रँडस्लॅम विजेतीपदे मिळवणारा जोकोव्हिच पाचव्यांदा या पुरस्काराचा मानकरी ठरला. जोकोव्हिचने येथेही स्वित्झर्लंडचा २० ग्रँडस्लॅम विजेता माजी टेनिसपटू रॉजर फेडररशी बरोबरी केली. माद्रिद येथे झालेल्या एका विशेष सोहळ्यात या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. “मी सर्वप्रथम २०१२ मध्ये हा पुरस्कार मिळवला होता. आता १२ वर्षांनंतर पुन्हा हा पुरस्कार मिळाल्याचा मला अभिमान वाटतो,’’ असे जोकोव्हिच म्हणाला.

महिला विभागात या पुरस्काराची मानकरी ठरलेली बोनमती हा सन्मान मिळवणारी पहिली फुटबॉलपटू ठरली आहे. यावेळी महिला विश्वचषक विजेत्या स्पेन संघाचाही सन्मान करण्यात आला. प्रथमच ही स्पर्धा जिंकल्याबद्दल त्यांना २०२३ वर्षातील सर्वोत्तम संघ म्हणून निवडण्यात आले. हे पुरस्कार २००० पासून दरवर्षी दिले जातात. क्रीडा क्षेत्रातील ६९ तज्ज्ञ या पुरस्कार्थींची निवड करतात.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in