जोकोव्हिचची मायामी ओपनमधून माघार

जोकोव्हिचला सध्या बीएनपी पॅरिबस ओपन स्पर्धेत बिगरमानांकित लुका नार्डी याच्याकडून ४-६, ६-३, ३-६ असा पराभव पत्करावा लागला.
जोकोव्हिचची मायामी ओपनमधून माघार

फ्लोरिडा : अव्वल मानांकित नोव्हाक जोकोव्हिच याने मायामी ओपन टेनिस स्पर्धेतून माघार घेतली आहे. खासगी तसेच व्यावसायिक समतोल साधण्याच्या दृष्टीने त्याने स्पर्धा सुरू होण्याच्या एक आठवडाआधी माघारीचा निर्णय घेतला.

“कारकीर्दीच्या या टप्प्यावर मला माझे खासगी आयुष्य तसेच व्यावसायिक वेळापत्रक सांभाळताना कसरत करावी लागत आहे. जगातील सर्वोत्तम चाहत्यांचा प्रतिसाद लाभत असलेल्या या स्पर्धेत खेळता येणार नसल्याचे दु:ख मला होत आहे,” असे जोकोव्हिचने सांगितले. जोकोव्हिचला सध्या बीएनपी पॅरिबस ओपन स्पर्धेत बिगरमानांकित लुका नार्डी याच्याकडून ४-६, ६-३, ३-६ असा पराभव पत्करावा लागला. ३६ वर्षीय जोकोव्हिचने आपल्या कारकीर्दीत सहाव्यांदा मायामी ओपन स्पर्धा जिंकली आहे. हार्डकोर्टवरील या स्पर्धेला पुढील आठवड्यात सुरुवात होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in