राज्य ऑलिम्पिक संघटनेकडून आता नवा क्रीडा पुरस्कार

राष्ट्रीय क्रीडा पातळीवर महाराष्ट्राचा नावलौकिक उंचावणाऱ्या खेळाडू, प्रशिक्षक आणि संघटनांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय आता राज्य सरकारबरोबर महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेकडून घेण्यात आला आहे.
राज्य ऑलिम्पिक संघटनेकडून आता नवा क्रीडा पुरस्कार

पुणे : राष्ट्रीय क्रीडा पातळीवर महाराष्ट्राचा नावलौकिक उंचावणाऱ्या खेळाडू, प्रशिक्षक आणि संघटनांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय आता राज्य सरकारबरोबर महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे या वर्षीपासून महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेने ‘एमओए’ क्रीडा पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे.

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेच्या बोट क्लब येथे पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये हा निर्णय घेण्यात आला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, क्रीडा आयुक्त राजेश देशमुख यांच्यासह राज्य ऑलिम्पिक संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. महाराष्ट्राचा नावलौकिक उंचावण्यात मोलाची कामगिरी करणाऱ्या खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक आणि खेळाच्या संघटनांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट जिल्हा संघटना, राज्य संघटना, सर्वोत्कृष्ट खेळाडू (पुरुष, महिला), सर्वोत्कृष्ट्र क्रीडा मार्गदर्शक (पुरुष, महिला) यांचा समावेश असेल. या पुरस्कारासाठी महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटना प्रायोजक आणि कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून निधी उभा केला जाईल.

logo
marathi.freepressjournal.in