आता माजी दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा खेळताना दिसणार

स्पर्धेच्या दुसऱ्या सत्रात जगभरातील अव्वल माजी क्रिकेटपटू एकत्र खेळताना दिसणार आहेत
आता माजी दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा खेळताना दिसणार

लिजेंड्स क्रिकेट लीग’ स्पर्धेच्या दुसऱ्या सत्राची घोषणा करण्यात आली असून यंदा या स्पर्धेत चार संघ सहभागी होणार आहेत. ११० आंतरराष्ट्रीय खेळाडू खेळताना दिसणार आहेत. वीरेंद्र सेहवाग, इरफान पठाण आणि युसूफ पठाण यांसारखे अनेक माजी दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा खेळताना दिसणार आहेत.यंदा ही स्पर्धा ओमानमध्ये २० सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे.

टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक आणि लिजेंड्स क्रिकेट लीगचे आयुक्त रवी शास्त्री म्हणाले की, दिग्गजांना पुन्हा मैदानावर उतरण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या सत्रात जगभरातील अव्वल माजी क्रिकेटपटू एकत्र खेळताना दिसणार आहेत. स्पर्धेच्या पहिल्या सत्रात भारत, पाकिस्तान, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूंनी भारत, आशियाई आणि उर्वरित जग या तीन संघांचे प्रतिनिधित्व केले होते. यावेळी इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) धर्तीवर चार फ्रँचायझींचे संघ सहभागी होतील. एलएलसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमण रहेजा म्हणाले की, ११० खेळाडू चार संघांमध्ये विभागले जातील. या स्पर्धेत भारताव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेचे खेळाडू सहभागी होणार आहेत. भारताचा माजी फलंदाज विरेंद्र सेहवाग या स्पर्धेच्या पहिल्या सत्रात सहभागी होऊ शकला नव्हता. मात्र, यावर्षी तो खेळणार आहे. त्याच्यासह इरफान आणि युसुफ पठाण ही भावंडेदेखील पुन्हा मैदानात उतरणार आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in