श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज नुवान तुशाराचे भारतातील आगमन लांबणार

आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरूकडून खेळणारा श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज नुवान तुशाराने न्यायालयात धाव घेतली होती.
तुशाराचे भारतातील आगमन लांबणार
तुशाराचे भारतातील आगमन लांबणार
Published on

नवी दिल्ली : आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरूकडून खेळणारा श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज नुवान तुशाराने न्यायालयात धाव घेतली होती. श्रीलंकन क्रिकेट मंडळाने (एसएलसी) ‘ना हरकत प्रमाणपत्र’ देण्यास मनाई केल्याने त्याविरोधात तुशाराने कोलंबो कोर्टात तक्रार नोंदवली आहे. आता तुशारा किमान पुढील २ आठवडे भारतात दाखल होऊ शकणार नाही.

तुशारा तंदुरुस्ती चाचणीत अपयशी ठरल्यामुळे श्रीलंकन बोर्डाने त्याला भारतात जाण्यास नकार दिल्याचे समजते. मात्र तुशाराने हा करार ३१ मार्चपर्यंतच असल्याचे सांगितले. श्रीलंकन क्रिकेट मंडळाशी ३१ मार्च, २०२६ रोजी करार संपुष्टात आल्यावर ते मला पुन्हा करारबद्ध करेपर्यंत रोखू शकत नाहीत, असे मत तुशाराने व्यक्त केले आहे. तसेच आपल्याला आयपीएलमध्ये खेळू द्यावे, अशी मागणीही त्याने केली आहे. त्यामुळे एसएलसीचे अध्यक्ष शमी सिल्व्हा यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांना ९ एप्रिल रोजी कोर्टात उपस्थित रहावे लागणार आहे.

श्रीलंकेचा मथीशा पाथिरानादेखील तंदुरुस्त असल्याने अद्याप भारतात दाखल झालेला नाही. तो कोलकाता संघाकडून खेळणार होता. तसेच ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कला अद्याप क्रिकेट बोर्डाने भारतात दाखल होण्याची परवानगी दिलेली नाही. एकूणच तुशाराच्या कृतीमुळे हे प्रकरण आणखी पेटले आहे. तुशारावर श्रीलंकन क्रिकेट मंडळ कारवाई करण्याची शक्यता असून कदाचित तो संपूर्ण आयपीएलला देखील मुकू शकतो.

दरम्यान, २८ मार्चपासून आयपीएलच्या १९व्या पर्वाला धडाक्यात प्रारंभ झाला. काही लढतींमध्ये धावांचा वर्षाव पाहायला मिळाला, तर काही सामन्यांत गोलंदाजांनी फलंदाजांना रोखले. तसेच बहुतांश लढतींमध्ये नाणेफेक जिंकून धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला.

logo
marathi.freepressjournal.in