जानेवारी 2024 मध्ये भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात एकदिवसीय मालिका

शुक्रवारी झालेल्या बीसीसीआयच्या सर्वोच्च परिषदेच्या बैठकीत जय शाह यांनी या दौऱ्यासाठी परवानगी दिली
जानेवारी 2024 मध्ये भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात एकदिवसीय मालिका
Published on

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात एकदिवसीय मालिका होणार असल्याची माहिती बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी दिली. ही एकदिवसीय मालिका यापूर्वी जून महिन्यात होणार होती. मात्र दोन्ही क्रिकेट बोर्डांच्या कराराने ही मालिका पुढे ढकलण्यात आली. यापूर्वी ही तीन सामन्यांची मालिका 23 जून ते 30 जून दरम्यान होणार होती. आता ही मालिका जानेवारी 2024 मध्ये होणार आहे.

शुक्रवारी झालेल्या बीसीसीआयच्या सर्वोच्च परिषदेच्या बैठकीत जय शाह यांनी या दौऱ्यासाठी परवानगी दिली. देशातील द्विपक्षीय सामन्यांसाठी नवीन मीडिया हक्क करार प्रक्रिया ऑगस्टच्या अखेरीस पूर्ण करणार असल्याचेही शाह यांनी जाहीर केले. हा करार पुढील चार वर्षांसाठी असेल.

जय शाह म्हणाले की बीसीसीआयचा नवीन मीडिया हक्क करार ऑगस्टच्या अखेरीस पूर्ण होईल. त्यानंतर आठ सामन्यांची ऑस्ट्रेलिया मालिका सुरू होईल. यामध्ये विश्वचषकापूर्वी तीन एकदिवसीय सामने आणि विश्वचषकानंतर पाच टी-२० सामने होणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in