ODI World Cup 2023 : आयसीसीकडून वर्ल्डकप अँथम लाँच ; रणवीर सिंगची देखील खास झलक, व्हिडिओ होतोय व्हायरल

या गाण्यामध्ये बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंगची उपस्थिती आकर्षणात आणखीनच भर घालताना दिसत आहे.
ODI World Cup 2023 : आयसीसीकडून वर्ल्डकप अँथम लाँच ; रणवीर सिंगची देखील खास झलक, व्हिडिओ होतोय व्हायरल

आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ सुरू होण्यासाठी फक्त काही दिवसांचा अवधी उरला आहे. अशात आयसीसीने या मोठ्या इव्हेंटचं अधिकृत गाणं 'दिल जश्न बोले' हे जारी केलं आहे. हे गीत सुप्रसिद्ध बॉलिवूड संगीतकार प्रीतम यांनी संगीतबद्ध केलं आहे. या गाण्यामध्ये बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंगची उपस्थिती आकर्षणात आणखीनच भर घालताना दिसत आहे. तसंच, यात भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा देखील नृत्य करताना दिसत आहे.

आयसीसीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये रणवीर सिंगने निळा शर्ट, मरून रंगाचा ब्लेझर आणि मॅचिंग टोपी घातलेली आहे. तसंच या व्हिडीओत चाहत्यांनी सर्व १० देशांची जर्सी घातलेले दिसत आहेत. संपूर्ण अँथम हे ट्रेनमध्ये चित्रित करण्यात आलं असून या व्हिडिओत रणवीर सिंग आणि प्रीतम ट्रेनच्या छतावर डान्स करताना दिसत आहेत.

येत्या ५ ऑक्टोबरपासून एकदिवसीय विश्वचषक २०२३ ला सुरूवात होणार आहे . त्याचा अंतिम सामना १९ नोव्हेंबर रोजी होणार आहे. विश्वचषकाचा पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन बलाढ्य संघात होणार आहे. भारतीय संघ ८ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या विश्वचषक मोहिमेला सुरुवात करणार आहे. भारताने नुकताच आशिया चषक २०२३चे विजेतेपद पटकावलं असून १२ वर्षांनी मायदेशात होणारा विश्वचषक जिंकण्याकडे भारतीय संघासह क्रिकेट प्रेमींचं लक्ष लागलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in