मानसिक छळ झाल्याचा ऑलिम्पिक पदक विजेती लोव्हलिनाचा आरोप

खेळातील राजकारणाला झुगारून देशासाठी पदक जिंकण्याचा निर्धार तिने व्यक्त केला.
मानसिक छळ झाल्याचा ऑलिम्पिक पदक विजेती लोव्हलिनाचा आरोप

माझा मानसिक छळ होत आहे. ज्या प्रशिक्षकांनी मला ऑलिम्पिक पदक जिंकण्यास मदत केली त्यांना बाजूला सारुन माझ्या सरावात अडथळे निर्माण केले जात आहेत, असा आरोप ऑलिम्पिक पदक विजेती लोव्हलिना बोरगोहेनने केला आहे. राष्ट्रकुल स्पर्धेसाठीचा सराव ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी आठ दिवस आधीच बंद केल्याचा दावा तिने केला. खेळातील राजकारणाला झुगारून देशासाठी पदक जिंकण्याचा निर्धार तिने व्यक्त केला.

लोव्हलिनाने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिले की, ‘‘मला खूप दुःख झाले आहे. माझा छळ होत आहे. ज्या प्रशिक्षकांनी मला ऑलिम्पिक पदक जिंकण्यास मदत केली त्यांना बाजूला काढूले जात आहे. माझ्या सरावात अडथळे निर्माण केले जात आहेत.’’ तिने सांगितले की, ‘‘या प्रशिक्षकांपैकी एक संध्या गुरूंगजी यांना द्रोणाचार्य पुरस्कारदेखील मिळाला आहे. माझ्या दोन्ही प्रशिक्षकांना सराव शिबिरात अनेकांची विनवणी केल्यानंतर सामील करून घेण्यात आले. मला या सरावात बऱ्याच अडचणींना तोंड द्यावे लागले. त्यामुळे मानसिक छळ आहे. संध्या यांना राष्ट्रकुल स्पर्धेच्या ठिकाणी देखील प्रवेश नाकारला गेला. त्यांना माघारी पाठविण्यात आले. मी विनंती करूनही उपयोग झाला नाही’’ लोव्हलिनाने खेळातील राजकारणावर नाराजी व्यक्त केली. तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘‘मी खेळावर कसे लक्ष केंद्रीत करू, तेच कळत नाही. या राजकारणामुळेच माझी गेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये निराशाजनक कामगिरी झाली. या राजकारणामुळे आता मला राष्ट्रकुल स्पर्धा देखील खराब करायची नाही. राजकारणाला छेद देत मी माझ्या देशासाठी पदक जिंकेन, अशी आशा आहे जय हिंद.’’

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in