'या' खेळाडून पटकावला सुवर्णपदकासह ऑलिम्पिक कोटा

यंदाच्या जागतिक चॅम्पियनशिपमध्ये ऑलिम्पिक कोट्याच्या चार जागा उपलब्ध आहेत.
'या' खेळाडून पटकावला सुवर्णपदकासह ऑलिम्पिक कोटा
Published on

भारताचा युवा नेमबाज रुद्राक्ष पाटीलने आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघाच्या (आयएसएसएफ) जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक जिंकून पॅरिस ऑलिम्पिक कोटा मिळविला. जागतिक चॅम्पियनशिपच्या १० मीटर एअर रायफल स्पर्धेत अभिनव बिंद्रानंतर ही कामगिरी करणारा रुद्राक्ष दुसरा भारतीय नेमबाज ठरला. २०२४ ऑलिम्पिक कोटा मिळवणारा तो दुसरा भारतीय नेमबाज आहे.

अठरा वर्षीय रुद्राक्षने इटलीच्या डॅनिलो डेनिस सोलाझोचा १७-१३ असा पराभव केला. यंदाच्या जागतिक चॅम्पियनशिपमध्ये ऑलिम्पिक कोट्याच्या चार जागा उपलब्ध आहेत. भारताने नुकताच क्रोएशियातील शॉटगन जागतिक नेमबाजी स्पर्धेमधील पुरुषांच्या ट्रॅप स्पर्धेत भावनीश मेंदिरट्टाच्या माध्यमातून पहिला कोटा मिळविला.

प्रथमच जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी झालेला रुद्राक्ष एका वेळी अव्वल दोन खेळाडूंचा निर्णय घेण्यासाठी नव्या फॉरमॅटमध्ये खेळल्या गेलेल्या सुवर्णपदकाच्या सामन्यात ४-१० ने पिछाडीवर होता. इटालियन नेमबाजाने बहुतांश सामन्यात आपली आघाडी कायम ठेवली पण भारतीय नेमबाजाने शानदार मुसंडी केले.

logo
marathi.freepressjournal.in